पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:04+5:302021-09-09T04:44:04+5:30
गडचिराेली : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच काेराेना व डेंग्यू आजाराचे सावट दिसून येत असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ...
गडचिराेली : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच काेराेना व डेंग्यू आजाराचे सावट दिसून येत असल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आजारांपासून दूर कशी राहील याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दूषित पाण्यापासून जवळपास पाच ते सहा प्रकारचे आजार हाेतात. यामध्ये गॅस्ट्राे हा पहिला आजार. गॅस्ट्राेच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब हाेत असतात. दूषित पाणी पिल्यानंतर पाच ते सहा तासामध्ये ही लक्षणे दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणे साथीच्या आजाराप्रमाणे पसरत असतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी हाेते. दूषित पाण्याने गॅस्ट्राे हाेताे. प्रसंगी सलाईन लावण्याची वेळ येते.
बाॅक्स ....
दूषित पाण्यामुळे हाेणारे आजार...
- दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूचा प्रवेश हाेत असताे. जलजन्य आजारांमुळे पाेटाचे विकार बळावतात.
- दूषित पाणी पिल्यानंतर एक ते दाेन दिवसात जुलाब माेठ्या प्रमाणात सुरू हाेतात.
- पाेटात प्रचंड दुखते, कळा येतात. तीन ते चार दिवसात ताप येताे. यावर ॲन्टिबायॉटिक औषध घेऊन बरे करण्याचा प्रयत्न असताे.
बाॅक्स .....
आजाराची लक्षणे...
- दूषित पाणी पिल्यानंतर सहा ते सात दिवसांनंतर उलट्या, ताप, लघवी पिवळी हाेणे, तसेच भूक मंदावणे आदी लक्षणे दिसून येतात. याशिवाय चार ते पाच दिवसांनी डाेळे पिवळे दिसायला लागतात. जवळपास महिना ते दीड महिन्याच्या कालावधीपर्यंत या आजाराची लक्षणे कायम असतात. दूषित पाण्यापासून टायफाॅईड हा आजार हाेताे. चार ते पाच दिवस माेठ्या प्रमाणावर ताप येताे. पाेटात प्रचंड दुखते.
बाॅक्स .....
लक्षणे दिसताच ही घ्या खबरदारी - डाॅ. काेटरंगे
पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाणे टाळावे. पाणीपुरी, भेळ व इतर पदार्थ खाणे टाळले पाहिजे. उलट्या व जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी हाेते. त्यावेळी मीठ, साखर, पाणी सतत पित राहावे. यामुळे शरीराला आराम मिळताे. याशिवाय काेणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार करावा, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सारंग काेटरंगे यांनी सांगितले.
बाॅक्स .....
आजार टाळण्यासाठी हे करा...
पावसाळ्यात शुद्ध पाणी, तेही उकळून प्यावे. मेडिक्लाेर ड्राॅप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ तळाशी जाऊन स्वच्छ पाणी मिळते.