अंधश्रद्धेला बळी पडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:11 AM2018-08-27T00:11:53+5:302018-08-27T00:12:48+5:30

प्रमुख जिल्हा व सत्र न्या. तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मेहरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा या संकल्पनेचा उलगडा केला. तसेच अंधश्रद्धेला बळी न पडता विरूद्ध प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Do not fall prey to superstition | अंधश्रद्धेला बळी पडू नका

अंधश्रद्धेला बळी पडू नका

Next
ठळक मुद्देप्रमुख न्यायाधीशांचे आवाहन : कायदेविषयक शिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रमुख जिल्हा व सत्र न्या. तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मेहरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा या संकल्पनेचा उलगडा केला. तसेच अंधश्रद्धेला बळी न पडता विरूद्ध प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जिल्हा कॉप्लेक्स हायस्कूल व अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने सदर विद्यालयाच्या सभागृहात मोटार वाहन कायदा व अंधश्रद्धेविरोधात कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. मार्गदर्शक म्हणून न्या. बी. एम. पाटील, विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव डी. जी. कांबळे, अंनिसेचे अध्यक्ष उद्धव डांगे, विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सागर म्हशाखेत्री आदी उपस्थित होते. डॉ. कुंभारे यांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये, शिक्षणातूनच अंधश्रद्धेचा नायनाट होऊ शकतो, असे सांगितले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विलास निंबोरकर तर आभार मडावी यांनी मानले.

Web Title: Do not fall prey to superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.