धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नका

By admin | Published: July 27, 2014 11:44 PM2014-07-27T23:44:12+5:302014-07-27T23:44:12+5:30

धनगर समाजाची संस्कृती आदिवासी समाजापेक्षा भिन्न असल्याने या जातीचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.

Do not include Dhangar community's ST category | धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नका

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नका

Next

गडचिरोली : धनगर समाजाची संस्कृती आदिवासी समाजापेक्षा भिन्न असल्याने या जातीचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.
भारतीय घटनेच्या कलम ३४२ अन्वये अनुसूचित जमातीमध्ये ४७ जमातींची सूची जाहीर करण्यात आली आहे. या ४७ जातींपेक्षा धनगर समाजाची संस्कृती व सामाजिक ओळख वेगळी आहे. हा धनगर समाज यापूर्वी ओबीसीमध्ये होता. त्यानंतर त्याला एनटीसीमध्ये टाकण्यात आले. धनगर जातीचा मुख्य व्यवसाय शेळ्या, मेंढ्या पालणे हा आहे. त्यामुळे सदर समाज भटक्या स्वरूपाचा आहे. अनुसूचित जमातीच्या ३६ क्रमांकावर धनगड अशी जात आहे. ती ओरॉन या जातीची पोट जात आहे. ओरॉन ही मुळची ओडीशातील जमात असून तिचे प्रादेशिक नाव धनगड आहे. धनगर व धनगड ही नावे भिन्न असून धनगड ही जमात आहे. तर धनगर ही जात आहे. आदिवासींच्या सोयीसवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी या जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. या विरोधात आदिवासी जनता तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. याचबरोबर बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मत ग्राह्य धरण्यात यावे, अशाही मागण्या केल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत येरमे, सरचिटणीस सदानंद ताराम, माधवराव गावड, आनंद कंगाले, भगवान आत्राम, शालीक मानकर, बंडू तिलगामे, राजेश्वर पदा आदी उपस्थित होते.

Web Title: Do not include Dhangar community's ST category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.