आरक्षण आमच्या हक्काचे... आदिवासींचा गडचिरोलीत महाक्रोश

By गेापाल लाजुरकर | Published: October 20, 2023 05:51 PM2023-10-20T17:51:00+5:302023-10-20T17:53:08+5:30

धनगरांचा समावेश करू नका; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आदिवासी बांधव

Do not include money, reservation is our right; Tribal community marched the Gadchiroli collector office | आरक्षण आमच्या हक्काचे... आदिवासींचा गडचिरोलीत महाक्रोश

आरक्षण आमच्या हक्काचे... आदिवासींचा गडचिरोलीत महाक्रोश

गडचिरोली : खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये गैरआदिवासी धनगर समाजाचा समावेश करू नये या मागणीसाठी जिल्ह्यातील २५ आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हजारो आदिवासी बांधवांनी शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात दिलेल्या विविध घोषणांनी शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला.

गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातून आदिवासींच्या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात जिल्हाभरातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘आरक्षण आमच्या हक्काचा..., आदिवासी बचाओ, संविधान बचाओ, जय सेवा, भारत माता की जय’ यासह विविध घोषणा मोर्चेकरूंनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोर्चेकरूंसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प., जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील विविध रस्ते पोलिसांनी बंद केले होते. रहदारीसाठी केवळ नवेगाव टी-पॉइंट ते सोनापूर रस्ता सुरू ठेवला होता. आंदोलनात आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, तसेच काँग्रेसचे नामदेव किरसान, विश्वजीत कोवासे, विकास कोडापे, नंदू नरोटे, डॉ. नितिन कोडवते, छगन शेडमाके, माधव गावळ, भरत येरमे, कुणाल कोवे, सैनू गोटा, सदानंद ताराम, दौलत धुर्वे, गंगाधर मडावी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य व आदिवासीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोर्चेकरूंच्या २६ मागण्या

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध घोषणा देऊन संयोजक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या नेतृत्वात विविध २६ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी समितीचे सचिव भरत येरमे, कार्याध्यक्ष माधवराव गावळ, उपाध्यक्ष प्रशांत मडावी, सहसचिव गुलाबराव मडावी, कोषाध्यक्ष नामदेव उसेंडी, चंद्रकुमार उसेंडी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Do not include money, reservation is our right; Tribal community marched the Gadchiroli collector office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.