पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:29+5:302021-08-15T04:37:29+5:30

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात ...

Do you eat Panipuri or invite typhoid? | पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय?

पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय?

Next

गडचिराेली : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर टायफॉइड हा आजार होतो. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफी हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो. दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे जीवाणूचा प्रादुर्भाव होऊन टायफॉइडची लागण होते. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. विशेषत: पाणीपुरी खाताना त्यात वापरणारे पाणी, स्वच्छता यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

टायफाॅइड हा आजार साल्माेनेला टायफी या जीवाणूपासून हाेताे. सदर जीवाणू (बॅक्टेरिया) टायफाॅइड झालेल्या रुग्णांच्या रक्तात आणि आतड्यांमध्ये असताे. टायफाॅइड तापाला विषमज्वर असेही म्हणतात. टायफाॅइड रुग्ण तसेच टायफाॅइड आजारातून नुकतेच बरे झालेले व्यक्ती यांच्या मलमूत्राद्वारे हे जीवाणू पसरत असतात.

बाॅक्स...

जिल्हा फणफणतोय

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांना ताप, सर्दी, डोकेदुखीसारखे आजार होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.

बाॅक्स....

आजाराची लक्षणे

ताप येतो. तो कमी-अधिक होतो. काहींना उलट्या किंवा जुलाबही होतात. पोट दुखणे, खोकला, अतिसार, डाेकेदुखी, अंगदुखी, थकवा येताे, अशक्तपणा वाढते, भूक मंदावते आदी लक्षणे टायफाॅइड या आजारावर दिसत असतात. अशी लक्षणे दिसताच वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

बाॅक्स...

ही घ्या काळजी

अस्वच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचे सेवन करू नये.

कुठलेही पाणी पिणे टाळावे. अन्नपदार्थ गरम करून खावेत.

दिवसातून तीनवेळा जेवण करावे.

घरामध्ये अन्न झाकून ठेवावे.

पाणी उकळून थंड करून प्यावे.

पावसाळ्यात कच्च्या भाज्या, जास्त पिकलेली फळे खाऊ नये.

नारळपाणी, ज्युस, लस्सी, ग्लुकोज पाणी आदी पदार्थ घ्यावे.

बाॅक्स...

टायफाॅइड आजार हाेण्याची कारणे

पावसाळ्यातील दूषित पाण्याच्या संपर्कातून टायफाॅइड आजाराची लागण हाेण्याची शक्यता अधिक असते. मलमूत्राद्वारे दूषित पाण्यातून, माशा बसलेल्या अन्नातून, अस्वच्छ हातांद्वारे हे जीवाणू निराेगी व्यक्तींच्या ताेंडातून शरीरात प्रवेश करतात. आतड्यात जाऊन त्या विषाणूंची संख्या वाढते. त्यानंतर जीवाणू आपला विषारी प्रभाव दाखवू लागतात. त्यामुळे फूड पॉयझनिंग झाले असता, मळमळ वाटते, उलट्या हाेतात.

Web Title: Do you eat Panipuri or invite typhoid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.