डॉक्टरांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:23 PM2017-09-17T23:23:09+5:302017-09-17T23:23:21+5:30

तालुक्यातील वडधा, भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कुरूंडी माल व पळसगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकात एकही स्थायी डॉक्टर नसल्याने परिचारिका....

Doctor's doctor | डॉक्टरांची वाणवा

डॉक्टरांची वाणवा

Next
ठळक मुद्देआरमोरी तालुका : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच नाही

महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील वडधा, भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कुरूंडी माल व पळसगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकात एकही स्थायी डॉक्टर नसल्याने परिचारिका व औषध संयोजकाच्या भरवशावर रूग्णालयांचा कारभार सुरू आहे.
तालुक्यातील भाकरोंडी, वैरागड, वडधा व देलनवाडी या चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. भाकरोंडी आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर कार्यरत होते. मात्र त्यापैकी डॉ. डाखोर यांचे निधन झाले. तर डॉ. सुरेश मोटे यांची बदली झाली. त्यामुळे आता या ठिकाणी एकही डॉक्टर नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार परिचारीकेवर आहे. वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील एक वर्षापासून एकही डॉक्टर नाही. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांची बदली झाल्याने याही ठिकाणी एकही स्थायी डॉक्टर नाही. देऊळगाव प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नागदेवते यांच्याकडे प्रभार सोपविला आहे. वडधा ते देऊळगाव येथील अंतर जवळपास १७ किमी आहे. त्यामुळे देऊळगाव सांभाळावे की वडधाला सेवा द्यावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दित जवळपास २० गावे येतात. येथे सध्या दोन डॉक्टरपैकी एकच डॉक्टर कार्यरत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे सेवानिवृत्त झाल्याने ५० हजार लोकसंख्येचा भार वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे यांच्यावर आला आहे. रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यास अडचण जात आहे. देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार सुध्दा एकाच वैद्यकीय अधिकाºयावर आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी यांची एक वर्षापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी अद्यापही दुसरे डॉक्टर देण्यात आले नाही. सध्या येथे डॉ. संजय सुपारे हे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे प्राथमिक आरोग्य पथकांचीही स्थिती दयनिय आहे. कुरंडी माल प्राथमिक आरोग्य पथकात सहा महिन्यांपासून एकही स्थायी डॉक्टर नाही. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुकरेजा हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी दुसरा डॉक्टर अद्यापही देण्यात आला नाही. पळसगाव प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांची एक वर्षापूर्वी बदली झाली. येथीलही वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. या दोन्ही प्राथमिक आरोग्य पथकाचा भार परिचारिका व औषधी संयोजकांना पेलावा लागत आहे.
आरमोरी तालुक्यात वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य पथकातील आरोग्य सेवा पांगळी झाली आहे. सध्या तालुक्यात हिवताप, मलेरिया, काविळ व इतर अनेक साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील नागरिक सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य पथकात उपचारासाठी येतात. मात्र या ठिकाणी डॉक्टरच राहत नसल्याने रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यास अडचण जात आहे. एखाद्या रूग्णाची आकस्मिक तब्येत बिघडली, सर्पदंश झाला किंवा गरोदर महिलेला दवाखान्यात नेले तर वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी ३० ते ४० किमी अंतरावर असलेल्या तालुकास्तरावरील रूग्णालयात आणावे लागते. परिणामी रूग्ण दगावल्या घटना घडत आहेत.

शाळा तपासणीचा अतिरिक्त भार
अगोदरच डॉक्टरांची वाणवा असताना कार्यरत डॉक्टरांना शाळा व अंगणवाड्यातील बालकांची आरोग्य तपासणी करावी लागते. तालुका व जिल्हास्तरावरील बैठका अहवाल याचीही कामे करावी लागत आहेत.
भाकरोंडी पीएचसीचा प्रभार असलेले डॉ. कोडापे हे सप्टेंबरअखेर सेवानिवृत्त होत आहेत. येथील रूग्णवाहिका चालकाविना पडून आहे.
भाकरोंडी व वडधात दोन मानसेवी डॉक्टरांना प्रतीनियुक्ती दिली आहे.

Web Title: Doctor's doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.