डॉक्टरांचे असहकार आंदोलन
By admin | Published: May 29, 2014 02:15 AM2014-05-29T02:15:23+5:302014-05-29T02:15:23+5:30
प्रलंबित मागण्या सोडवाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट-अ तर्फे बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टरांनी काळ्या फीत लावून काम केले.
गडचिरोली : प्रलंबित मागण्या सोडवाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट-अ तर्फे बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टरांनी काळ्या फीत लावून काम केले. त्यामुळे वैद्यकीय सेवा प्रभावीत झाली नाही. मात्र मागण्या मान्य न झाल्यास २ जूनपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. २00९-१0 मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलक्ष लाभ देण्यात यावा, ७७९ बीएएमएस व ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकार्यांना सेवा समावेशन करण्यात यावे, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतन देण्यात यावे, एमबीबीएस, बीएएमएस पदव्यूत्तर वैद्यकीय अधिकार्यांचा खाते अंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांना ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रिक वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटनेतर्फे असहकार आंदोलन सुरू केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्यांच्या समस्यांकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे डॉक्टर शासकीय सेवा करण्यास तयार होत नाही. याचा परिणाम गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर काळ्या फीती लावून दिवसभर रूग्णसेवा केली. त्यामुळे रूग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. शांततेने चालणार्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास २ जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मॅग्मो संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर, सचिव डॉ. सुनिल मडावी, कार्याध्यक्ष डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. आखाडे, डॉ. देवरी, डॉ. तारडे, डॉ. करेवार, डॉ. ताराम, डॉ. म्हस्के, डॉ. धुर्वे, डॉ. कारेकर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)