हळवाही ग्रा.पं.वर काँग्रेस-शिवसेना आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:41+5:302021-01-25T04:37:41+5:30

चामाेर्शी : चामोर्शी तालुक्यातील हळदवाही ग्रामपंचायतीवर शिवसेना काँगेस समर्थित परिवर्तन ग्रामविकास पॅनलने वर्चस्व मिळविले आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य ...

Dominance of Congress-Shiv Sena alliance on Halwahi village | हळवाही ग्रा.पं.वर काँग्रेस-शिवसेना आघाडीचे वर्चस्व

हळवाही ग्रा.पं.वर काँग्रेस-शिवसेना आघाडीचे वर्चस्व

Next

चामाेर्शी : चामोर्शी तालुक्यातील हळदवाही ग्रामपंचायतीवर शिवसेना काँगेस समर्थित परिवर्तन ग्रामविकास पॅनलने वर्चस्व मिळविले आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या जागांसाठी २० जानेवारी रोजी मतदान पार पडले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख अजय पुडो व काँगेसचे डोनू हिचामी, विकास मेश्राम यांच्या गटाने विजय संपादन केला आहे.

विजयी उमेदवारांमध्ये डोनू बुरांडा हिचामी, छत्रपती मारुती दुर्गे, सोनीताई गणपती टेकाम, नीता अजय पुडो, चंद्रकला हनुमंत तोकलवार, माधुरी जगदीश मेश्राम, वसंत केशव पदा, कविता सुनील हिचामी, गोपिका विनायक राजूरवार यांचा समावेश आहे. याप्रसंगी संजय हिचामी, सुनील चुनारकर गौतम खोब्रागडे, प्रवीण खेडकर, रणजित खेडकर, पत्रुजी करपते, दिलीप गावडे, आनंदराव नरोटे, किसन कुजलवार, गुरुदास गव्हारे, विलकंठ मेश्राम, राकेश अलाम, भाष्कर मीचा, महेंद्र पुडो, माजी सरपंच दिलीप पदा, सुधाकर नरोटे, किशोर हिचामी, चक्रदास मेश्राम, जमनादास भसारकर, उमाजी गावडे, सुनील हिचामी, मधुकर धर्वे, निकेश कांबळे, बालाजी मुत्तेवार, शालिक पोटावी, मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी आतषबाजी करून व गुलाल उधळून विजयी रॅली काढण्यात आली.

बाॅक्स

ग्रा.पं.च्या माध्यमातून गावाचा विकास करा -धर्मा राॅय

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात गडचिराेली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीवर शिवसेनेन भगवा फडकविला आहे. हळदवाही गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. ग्रा.पं. सदस्यांनी प्रामाणिकपणे जनतेची कामे करून गावाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धर्मा राॅय यांनी केले.

हळदवादी येथे शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीचे शिवसेना ५ व काँग्रेस ४ असे ९ सदस्य निवडून आल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धर्मा रॉय यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते विलास ढोंबरे, शहरप्रमुख बंडुजी नैताम, आदी गावकरी उपस्थित होते.

Web Title: Dominance of Congress-Shiv Sena alliance on Halwahi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.