४५ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:39+5:302021-01-25T04:37:39+5:30
अहेरी : यंदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने एकहाती सत्ता मिळविली ...
अहेरी : यंदाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने एकहाती सत्ता मिळविली आहे, असा दावा राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केला आहे. सहा ठिकाणच्या ग्रामपंचायतींत अटीतटीची परिस्थिती असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल घोडदौड करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आमदार धर्मरावबाबा अत्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम करून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळविले.
अहेरी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने झेंडा फडकाविला असून आलापल्ली व नागेपल्ली ग्रामपंचायतीत अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली असून, या दाेन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचेचे नागेपल्ली ग्रामपंचायतीत अटीतटीचे सावट असून या दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पारडे जड दिसत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसे झाल्यास अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कब्जा असणार आहे.
सिरोंचा तालुक्यात २७ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने निर्विवाद सत्ता प्राप्त केली असून, दोन ठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची परिस्थिती आहे.
भामरागड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक होती. या दोन्ही ठिकाणांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्तेत बसण्यासाठी साधे खाते उघडू दिले नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.
मूलचेरा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने सत्ता मिळविली असून एका ठिकाणी अटीतटीची परिस्थिती आहे.
एटापल्ली तालुक्यात एकूण १४ ग्रामपंचायतींपैकी नऊ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात ८५ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. सहा ग्रामपंचायतींच्या ठिकाणी अटीतटीची परिस्थिती असली तरी या ग्रामपंचायतींवरही राष्ट्रीय कॉग्रेेस आपला झेंडा फडकवेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.