मार्कंडेश्वराच्या चरणी ४ लाख ३० हजारांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:28+5:30

मार्कंडादेव येथे २१ फेब्रुवारीपासून जत्रेला सुरूवात झाली. मार्कंडेश्वराच्या मंदिराच्या देखभाल व इतर कामांसाठी मार्कंडादेव ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या वतीने गुप्तदानपेट्या लावण्यात आल्या होत्या. २६ फेब्रुवारी रोजी गुप्त दानाची मोजणी श्री मार्कंडेश्वर देवस्थान कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली.

A donation of Rs 4 lac 30 thousands | मार्कंडेश्वराच्या चरणी ४ लाख ३० हजारांचे दान

मार्कंडेश्वराच्या चरणी ४ लाख ३० हजारांचे दान

Next
ठळक मुद्देगेल्यावर्षीपेक्षा दीडपटीने दानात वाढ : पोलीस बंदोबस्तात बुधवारी उघडल्या पेट्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. जत्रेसाठी आलेल्या भाविकांनी ४ लाख ३० हजार ६३५ रुपयांचे दान मार्कंडेश्वराला केले आहे. मागील वर्षीच्या जत्रेत २ लाख ८४ हजार रुपयांचे दान प्राप्त झाले होते. मागील वर्षी तुलनेत यावर्षी अधिक दान प्राप्त झाले आहे.
मार्कंडादेव येथे २१ फेब्रुवारीपासून जत्रेला सुरूवात झाली. मार्कंडेश्वराच्या मंदिराच्या देखभाल व इतर कामांसाठी मार्कंडादेव ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या वतीने गुप्तदानपेट्या लावण्यात आल्या होत्या. २६ फेब्रुवारी रोजी गुप्त दानाची मोजणी श्री मार्कंडेश्वर देवस्थान कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. भाविकांकडून पावती स्वरूपात १ लाख ९० हजार रुपये प्राप्त झाले. तर दानपेट्यांमध्ये भाविकांनी ३ लाख २१ हजार ६३५ रुपये टाकले. बुधवारी सकाळपासून पैसे मोजणीला सुरूवात झाली. रात्री उशीरापर्यंत मोजमाप व हिशेबाचे काम आटोपले. यावेळी मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तिवाडे, नायब तहसीलदार एस. आर. तनगुलवार, पुरातत्व विभागाचे अधिकारी पी. एस. पसीने, जयराम चलाख, मदन कुनघाडकर, उज्वला गायकवाड, मनोहर कत्रे, अनिल रहांगडाले, यशवंत नैताम, देवेंद्र सहारे, मनोहर हिचामी, किशोर मारगाये, संदीप भिवनकर, बंडू बारसागडे, रामेश्वर गायकवाड, व्यवस्थापक प्रभाकर गेडाम, पुरूषोत्तम शेंडे, चंदू गेडाम हजर होते. गुप्त दानातून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम बँकेत जमा केली जाणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भांडेकर यांनी दिली आहे. यावेळी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता.

Web Title: A donation of Rs 4 lac 30 thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.