गाढवी नदी आटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:58 PM2019-02-26T23:58:16+5:302019-02-26T23:58:51+5:30
गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : गेल्या पावसाळ्यात पाऊस चांगलाच बरसला. मात्र पाणी साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने उन्हाळयाच्या सुरूवातीलाच देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागातील नदी, नाले तलाव, बोडया व इतर पाणी स्त्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी यंदाच्या उन्हाळयात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निमाण होणार आहे.
आॅगस्ट महिन्यापूर्वी आलेल्या पावसाने भरलेले पाण्याचे स्त्रोत धानाला वाचविण्यासाठी धावून आले. धान वाचले, पिकले. मात्र यामुळे नदी, नाले, तलावातील पाणीसाठा कमी झाला. आजघडीला विसोरा जवळून वाहणाऱ्या गाढवी नदीचा पाणी प्रवाह मागील दहा दिवसांपूर्वीच बंद झाला असून नदी कोरडी पडली आहे.
गोंदिया जिल्ह्यातून उगम पावलेल्या गाढवी नदीवर गोठणगाव जवळ इटियाडोह येथे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ओलीत केली जाते. गाढवी नदी आणि तिच्यावरील बांधलेले इटियाडोह धरण गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचन करण्याचे काम करते. तसेच नदीच्या किनाऱ्यावरील गावांत नदीतूनच पिण्याचे पाणी पुरविले जाते. विसोरा गावातील आणि आजूबाजूच्या पाणीसाठ्यांत पाणीपातळी कमी होत आहे. पण नदीचा पाणीप्रवाह बंद झाल्याने शेतकरी, शेतमजूर, जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होण्याची चाहूल आतापासूनच लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसºया आठवड्यापासून नदीचा पाणी प्रवाह बंद होत होत आता पूर्ण बंद होऊन नदी कोरडी झाली आहे. नदीतल्या खड्डे वा सखल भागात पाणी साचलेले दिसते मात्र ते पाणी उन्हाची तीव्रता वाढताच आटणार आहे.
देसाईगंज तालुक्यातून वाहणाºया गाढवी नदीवर एकाही ठिकाणी बंधारा बांधलेला नसून शेतकरी सखल भागात खड्डा किंवा रेतीची भिंत उभी करून पाणी अडवतात. ज्या पाण्याचा वापर नदिकाठच्या शेतात पिकविल्या जाणाºया धानपीक, भाजीपाला पिकासाठी केला जातो. यंदाच्या रबी हंगामात परिसरातील नदीकाठी असलेल्या शेतात धानपीक पेरणी केली असून काहींनी मोटर पंप लावून धानरोवणी सुद्धा आटोपली आहे. पण काही शेताच्या नदीकिनारी नदी पात्रात पाणीच नाही त्यामुळे त्या शेतातील धान वाफे पाण्याविना वाळत चालले आहेत. दुसरीकडे रोवणी केलेले धानपीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. सूर्याची तीव्रता जसजशी वाढत जाईल तशीच पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे. रोवणी केलेल्या शेतीला पाणी न झाल्यास धान करपून जाण्याची शक्यता आहे.
गाढवी नदीचा पात्र गवत, झाडाझुडुपांनी वेढला आहे त्यातच नदीच्या पात्रात आपापल्या सोयीनुसार पाणी अडवले जाते त्यामुळे पाणी सखल भागात पाणी साचून राहल्याने या परिसरात पाणी कमी येतो. गाढवी नदीचा पाणी प्रवाह आटल्याणे गाढवी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्वांवर याचा थेट प्रभाव पडण्याची शक्यता आहे.