शिक्षकाची नाेकरी नकाे रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:38 AM2021-09-11T04:38:22+5:302021-09-11T04:38:22+5:30
गडचिराेली : काळानुसार जिल्ह्यासह राज्यभरात डीएड् महाविद्यालयांची संख्या भरमसाट वाढली. परिणामी डीएड्धारकांच्या फाैजा बाहेर निघाल्या. त्यामानाने नाेकऱ्या लुप्त झाल्या. ...
गडचिराेली : काळानुसार जिल्ह्यासह राज्यभरात डीएड् महाविद्यालयांची संख्या भरमसाट वाढली. परिणामी डीएड्धारकांच्या फाैजा बाहेर निघाल्या. त्यामानाने नाेकऱ्या लुप्त झाल्या. आता गेल्या सात-आठ वर्षांपासून डीएड् करूनही नाेकरीची हमी नसल्याने गडचिराेली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी डीएड्च्या अभ्यासक्रमाकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे.
पूर्वी डीएड् म्हटले की, प्राथमिक शिक्षकांची सरकारी नाेकरी पक्की हाेती. डीएड्चे शिक्षण सुरू असतानाच परिसरातील लाेक त्या विद्यार्थ्याला माेठ्या आदराने ‘गुरुजी’ असे म्हणत हाेते. त्यावेळच्या सरकारने डीएड् महाविद्यालयाची खैरात वाटली. बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी डीएड्कडे धाव घ्यायचे, आता परिस्थिती बदलली.
बाॅक्स...
म्हणून इतर अभ्यासक्रमांना घेतला प्रवेश
मी यावर्षी बारावी उत्तीर्ण झालाे. मी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालाे. डीएड्ला मला प्रवेश मिळाला असता. मात्र नाेकरीची गॅरन्टी नसल्याने आपण आयटीआयच्या वीजतंत्री ट्रेडला प्रवेश घेतला आहे. आयटीआयनंतर पाॅलिटेक्निककडे वळणार आहे.
- विशाल साेनटक्के
............
मी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळलाे आहे. डीएड् अभ्यासक्रमाला आता फारसा स्काेप नाही. त्यामुळे डीएड्साठी अर्ज केला नाही. स्वत:चा व्यवसाय किंवा नाेकरीची संधी असलेल्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळावे.
- अंकित काेठारे
.............
डीएड् अभ्यासक्रम पूर्ण करूनही नाेकरीची हमी नसल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवित आहे. जिल्ह्यातील चार महाविद्यालयासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात ५० प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहे. आठ दिवसांत गुणवत्तेनुसार प्रवेश हाेतील.
- शरदचंद्र पाटील, प्राचार्य, डायट
...........
विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांपासून डीएड् अभ्यासक्रमांकडे पाठ फिरविली आहे. डीएड् झाल्यानंतर नाेकरी लागली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र ही अपेक्षा पूर्ण हाेत नसल्याचे दिसते. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची साेय केली आहे.
- संताेष संगनवार, प्राचार्य
बाॅक्स...
नाेकरीची हमी नाही!
डीएड् करूनही आता नाेकरीची हमी नाही. डीएड् उत्तीर्ण झाल्यानंतर टीईटी, टीएआयटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्यानंतर गुणवत्तेनुसार शिक्षक पदासाठी उमेदवारांची निवड हाेते.