अनाेळखी माणसाला माेबाईल देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 05:00 AM2021-08-20T05:00:00+5:302021-08-20T05:00:44+5:30

यूपीआयने जाेडलेले खाते एकदाच पिन नंबर विचारते. अनेकांना पिन नंबर लक्षात राहत नाही; त्यामुळे नागरिक पिन नंबरही माेबाईलमध्येच सेव्ह करून ठेवतात. ताेही पिन नंबर याच नावाने सेव्ह राहतो. ही बाब चाेरट्यांना माहीत असल्याने तो ते सहज शाेधून बघतात. विशेष म्हणजे एखाद्याला फाेन लावायचा आहे, असे सांगून फाेन मागत असल्याने आपणही त्याकडे लक्ष देत नाही. मात्र यातच घाेळ हाेतो आणि काही कालावधीतच आपले पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले जातात व आपली फसवणूक हाेऊ शकते. 

Don't give my mobile to a stranger! | अनाेळखी माणसाला माेबाईल देऊ नका !

अनाेळखी माणसाला माेबाईल देऊ नका !

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : अनेक नागरिकांचे स्मार्ट फाेन यूपीआय प्रणालीने बँकेसाेबत जाेडलेले राहतात. त्यामुळे अनाेळखी व्यक्तीच्या हातात काही कालावधीसाठी माेबाईल दिल्यास धाेका हाेऊन बँकेतील संपूर्ण पैसे गहाळ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना माेठ्या शहरांमध्ये घडत चालल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
यूपीआयने जाेडलेले खाते एकदाच पिन नंबर विचारते. अनेकांना पिन नंबर लक्षात राहत नाही; त्यामुळे नागरिक पिन नंबरही माेबाईलमध्येच सेव्ह करून ठेवतात. ताेही पिन नंबर याच नावाने सेव्ह राहतो. ही बाब चाेरट्यांना माहीत असल्याने तो ते सहज शाेधून बघतात. 
विशेष म्हणजे एखाद्याला फाेन लावायचा आहे, असे सांगून फाेन मागत असल्याने आपणही त्याकडे लक्ष देत नाही. मात्र यातच घाेळ हाेतो आणि काही कालावधीतच आपले पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले जातात व आपली फसवणूक हाेऊ शकते. 

ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाते फसवणूक

वेगळी लिंक पाठवून

एक वेगळ्या प्रकारची लिंक  माेबाईलवर पाठविली जाते. यासाेबतच ओटीपी नंबरही मागितला जातो.

केवायसीसाठी फाेन

केवायसीसाठी आवश्यक आहे असे सांगून बँक खात्याची केवायसी अपडेट करायची आहे. ओटीपीशिवाय केवायसी अपडेट हाेत नाही, असे सांगून.
 

लाॅटरी लागली आहे

आपल्याला लाॅटरी लागली आहे. बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी ओटीपीची गरज असे सांगितले जाते.

फायनान्सची प्रक्रिया 

तुम्ही फायनान्स घेतला आहे. काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे तुमचे बॅंक अकाऊंट नंबर सांगा त्यानंतर ओटीपी येईल. ताे क्रमांक सांगण्यास विचारले जाते.

माेबाईलवर ऑनलाईन पद्धतीने मिळवितात ताबा
एखाद्या ॲपची लिंक पाठवून ॲप डाऊनलाेड करण्यास सांगितले जाते. या ॲपमुळे दुसऱ्या हातात माेबाईलचे कंट्राेलिंग जाते. 

ही काळजी घ्या

शिकला-सवरलेला दिसत असेल मात्र ताे जर आपला माेबाईल मागत असेल तर त्याच्या हातात माेबाईल देऊ नका. फाेन करण्यासाठी माेबाईल दिला असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा.

बँक कधीही फाेन करून बँक खात्याची माहिती विचारत नाही. त्यामुळे बँकेतून बाेलताे, असे सांगितला तरी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. 

पिन नंबर, सीसीव्ही नंबर माेबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका. दुसऱ्या सांगण्यावरून अनाेळखी ॲप डाऊनलाेड करू नये. तसे करणे जाेखमीचे ठरू शकते.

 

Web Title: Don't give my mobile to a stranger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.