पेट्राेल-डिझेल अवाक्याबाहेर कुठलेही वाहन नकाे रे बाबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 05:00 AM2022-06-10T05:00:00+5:302022-06-10T05:00:38+5:30
आता पेट्राेल वा डिझेलवर चालणारे काेणतेही वाहन असाे परवडेनासे झाले आहे. सद्यस्थितीत डिझेलवरील कार बंद करण्यात आल्या आहेत. मात्र पाच वर्षांपूर्वीच्या अनेक कार डिझेलवर चालतात. पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये असलेला फरक लक्षात घेऊन त्या काळात डिझेलवरील कार खरेदी करण्यात आल्या. मात्र आता डिझेलचे दरसुद्धा माेठ्या प्रमाणात वाढले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पेट्राेलच्या तुलनेत डिझेल स्वस्त आहे, असे समजून काही नागरिक डिझेलवरील कार खरेदी करतात. मात्र पेट्राेल व डिझेलच्या किमतीत जेमतेम १५ रुपयांचा फरक आहे. त्यामुळे आता पेट्राेल वा डिझेलवर चालणारे काेणतेही वाहन असाे परवडेनासे झाले आहे. सद्यस्थितीत डिझेलवरील कार बंद करण्यात आल्या आहेत. मात्र पाच वर्षांपूर्वीच्या अनेक कार डिझेलवर चालतात. पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये असलेला फरक लक्षात घेऊन त्या काळात डिझेलवरील कार खरेदी करण्यात आल्या. मात्र आता डिझेलचे दरसुद्धा माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. डिझेलचे दर आता पेट्राेलच्या बराेबर पाेहाेचले आहेत.
महागाई पाठ साेडत नाही
- काेराेनामुळे अनेकांचे राेजगार गेले असताना महागाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जगावे कसे, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमाेर निर्माण झाला आहे. प्रत्येक वस्तूवर खर्च करताना आखडते हात घेऊन जगावे लागत आहे.
- डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्च व वस्तूच्या किमतीवर पडला असल्याचे दिसून येत आहे.
...कार घेणे साेपे मात्र वापरणे कठीण
काही पैसे भरून इएमआयवर कार घेणे फार कठीण नाही. मात्र कारमध्ये पेट्राेल टाकून कार चालविणे महाग झाले आहे. अनेक कर्मचारी स्वत:कडील कारचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात करतात. गावात फिरणे, कार्यालयात जाण्यासाठी साधारणपणे दुचाकीचा वापर करतात.
- अमित तिवाडे, वाहनमालक