खचू नका, जिद्द ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:38 AM2021-02-24T04:38:01+5:302021-02-24T04:38:01+5:30

भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली कडून आदिवासी युवक आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर त्यांच्या व्याख्यान कार्यक्रमचे ...

Don't waste, persevere | खचू नका, जिद्द ठेवा

खचू नका, जिद्द ठेवा

googlenewsNext

भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली कडून आदिवासी युवक आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर त्यांच्या व्याख्यान कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते। २०१९ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेत ऑल इंडिया रँक मध्ये त्यांना २४५ वा क्रमांक मिळाला आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस बलात अससिस्टंट कमांडेट म्हणून त्यांची निवड झाली आहे. स्थानिक आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत जागरूक व्हावा म्हणून एटापल्ली तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांच्या व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला जात आहे. कार्यक्रमाला आदिवासी विकास निरीक्षक रवि आत्राम, पोलीस उपनिरीक्षक पी वि गरकल, सावित्री काळे आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

मार्गदर्शन करताना विलास गावडे म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थी नी स्वतःला कमकुवत समजू नये. मेहनत करण्याची तयारी ठेवावी. आदिवासी भागांतून आल्यामुळे अनेक अडचणी येतात. त्यांच्यावर मात करावी. असे केले तरच यश मिळेल. मी 10 व्या वर्गात नापास झालो होतो. शाळा सोडली असती तर खेड्यात असतो. पण पुन्हा अभ्यास सुरू केला. काहीतरी बनायचे आहे. या ध्येयाने कामाला लागलो. आजही बस जात नसलेल्या गावातून पुण्यात शिकायला गेलो. मेहनत घेतली अनेकदा अपयश आले पण ध्येय गाठण्यासाठी अभ्यास सुरू ठेवला आणि यशस्वी झालो असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक गरकल, काळे यांनी ही मार्गदर्शन केले. कार्यक्रम चे संचालन संजना उसेंडी हिने केले, प्रास्ताविक प्रा किशोर बुरबुरे ,आभार शिक्षक ए आर शेख यांनी मानले.

Web Title: Don't waste, persevere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.