काेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:33 AM2021-04-03T04:33:07+5:302021-04-03T04:33:07+5:30

बाॅक्स ........ काेराेनाचे रूग्ण आढळलेल्या परिसरात साॅफ्ट कंटेनमेंट झाेन ज्या परिसरात काेराेनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच भविष्यात काेराेना ...

At the door of the administration citizens to keep Kareena | काेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या दारात

काेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या दारात

Next

बाॅक्स ........

काेराेनाचे रूग्ण आढळलेल्या परिसरात साॅफ्ट कंटेनमेंट झाेन

ज्या परिसरात काेराेनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच भविष्यात काेराेना आढळून येतील, त्या परिसराला साॅफ्ट कंटेनमेंट झाेन घाेषित केले जाईल. साॅफ्ट कंटेनमेंट असलेल्या भागात व्यवहारांवर काेणतेही प्रतिबंध राहणार नाही. मात्र त्या भागातील ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांनी काेराेना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक राहणार आहे. यासाठी प्रशासनामार्फत संबंधित नागरिकांना टाेकण दिले जाईल. या टाेकणवर काेणत्या दिवशी व काेणत्या केंद्रावर काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे, याची माहिती दिली जाईल. २ ते ३ दिवसांत संपूर्ण नागरिकांचे लसीकरण पूर्ण हाेईल, या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार आहे. मात्र नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद न दिल्यास त्या परिसराला हाॅर्ड कंटेनमेंट म्हणून घाेषित केले जाईल.

बाॅक्स ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक

नगरसेवकाला संबंधित वाॅर्डाच्या स्थितीची बरीच माहिती राहते. त्यामुळे लसीकरणासाठी नगरसेवकांचे सहकार्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत प्रशासनामार्फत राबवित असलेल्या उपाययाेजनांची माहिती नगरसेवकांना दिली जाईल. तसेच यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले जाणार आहे.

काेट ......

वाढत्या काेराेना रूग्णांची संख्या लक्षात घेता नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. गडचिराेली शहरात सर्वाधिक रूग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर विशेष भर प्रशासनाने दिले आहे. याला सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ज्या भागात काेराेना रूग्ण आढळून येतील त्या भागाला साॅफ्ट कंटेनमेंट घाेषित केले जाणार आहे. या भागातील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेईल. तरीही नागरिकांनी लसीकरण केले नाही तर हाॅर्ड कंटेनमेंट घाेषित करून व्यवहारांवर प्रतिबंध घातले जाईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. - कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली.

Web Title: At the door of the administration citizens to keep Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.