ओपीडीत दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:42 AM2021-08-20T04:42:51+5:302021-08-20T04:42:51+5:30

पावसाळ्याला सुरुवात हाेताच आजारांमध्ये वाढ हाेते. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक विहिरीचे पाणी पितात. ग्रामीण भागात पाणी शुद्धिकरणाची काेणतीही साेय ...

Double increase in OPD | ओपीडीत दुप्पट वाढ

ओपीडीत दुप्पट वाढ

Next

पावसाळ्याला सुरुवात हाेताच आजारांमध्ये वाढ हाेते. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक विहिरीचे पाणी पितात. ग्रामीण भागात पाणी शुद्धिकरणाची काेणतीही साेय नाही. त्यामुळे विहिरीचे जसेच्या तसे पाणी पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच शेतावर जाणारे नागरिक काही वेळेवर नदी, नाल्याचे पाणी पितात. यामुळे डायरिया हाेण्याची शक्यता राहते. तसेच मध्यंतरी १५ दिवस पावसाने उसंत घेतली हाेती. त्यामुळे दमट वातावरण निर्माण हाेऊन डासांची पैदास वाढली हाेती. त्यामुळे जिल्हाभरातच मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येकच रुग्णालयाच्या ओपीडीत तपासणी करणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली असल्याचे दिसून येते.

बाॅक्स...

मुलांची काेराेना चाचणी

सर्दी, ताप, खाेकला, आदी लक्षणे असलेला बालक उपचारासाठी रुग्णालयात आल्यास त्याची काेराेना तपासणी करण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. त्यामुळेच दरदिवशी जिल्हाभरात सरासरी ६०० काेराेना चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, काेराेनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

बाॅक्स...

डेंग्यू, मलेरियाची चाचणी

मलेरियाच्या बाबतीत गडचिराेली जिल्हा अतिशय संवेदनशील आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण अधिक राहतात. त्यामुळे तापाची लक्षणे घेऊन आलेल्या व्यक्तीची मलेरिया तपासणी केली जात आहे. काही रुग्णांची डेंग्यू तपासणीसुद्धा केली जात आहे.

बाॅक्स...

१०० खाटांच्या दवाखान्यात २५० रुग्ण भरती

गडचिराेली येथील महिला व बाल रुग्णालयाची क्षमता १०० खाटांची आहे. मात्र, सद्य:स्थितीत या रुग्णालयात जवळपास २५० रुग्ण उपचार घेत आहेत. बेड नसल्याने खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. यामध्ये प्रामुख्याने गराेदर माता, प्रसूती पश्चात माता व बालके, कुपाेषित मुले व १२ वर्षांपर्यंत इतर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांचा समावेश आहे.

बाॅक्स...

ही काळजी घ्या

- पाणी उकळून प्यावे

- झाेपताना मच्छरदाणीचा वापर करावा

- जवळपास पाणी साचू देऊ नये

काेट...

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पाणी उकळूनच प्यावे. नदी, तलावामधील पाणी पिऊ नये. झाेपताना मच्छरदाणीचा वापर करावा. बालकाची तब्येत बिघडल्यास तत्काळ जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी न्यावे.

- डाॅ. दीपचंद साेयाम, अधीक्षक महिला व बालरुग्णालय, गडचिराेली

Web Title: Double increase in OPD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.