डॉ. आंबेडकर विद्यालयाचे घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:23 AM2021-07-19T04:23:44+5:302021-07-19T04:23:44+5:30

विद्यालयातील १६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. हे संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रावीण्य श्रेणीत २९ विद्यार्थी, ...

Dr. Ambedkar Vidyalaya's resounding success | डॉ. आंबेडकर विद्यालयाचे घवघवीत यश

डॉ. आंबेडकर विद्यालयाचे घवघवीत यश

googlenewsNext

विद्यालयातील १६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. हे संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रावीण्य श्रेणीत २९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ८६ विद्यार्थी, तर द्वितीय श्रेणीत ४९ उत्तीर्ण झाले. शाळेतून तनुजा नरेंद्र नखाते हिने ९६.८० टक्के, आचल लीलाधार बोडणे ९५ टक्के, तर प्रणय डंबाजी कलसार याने ९४.२० टक्के गुण घेऊन अव्वल तीन क्रमांकावर बाजी मारली. याशिवाय जयश्री सुरेश म्हशाखेत्री ९३.८०, सुकेशनी नागसेन गोडसे ९३ टक्के, कुलदीप सुभाष आंबेकर ९१.६० टक्के,श्रुती संजय चहांदे हिने ९१ टक्के गुण मिळविले.

संस्था अध्यक्ष मदन मेश्राम, सचिव ॲड. प्रशांत मेश्राम, प्राचार्य व्ही. जी. शेंडे, शिक्षक केशव बांबोळे, हंसराज बडोले, खोब्रागडे, दुरबुडे, वरिष्ठ लिपिक सोमनकार व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

170721\1658-img-20210717-wa0046.jpg

आरमोरी येथील डॉ आंबेडकर विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी

Web Title: Dr. Ambedkar Vidyalaya's resounding success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.