अनिल हिरेखन गाेंडवाना विद्यापीठाचे नवे कुलसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 12:18 PM2022-07-20T12:18:53+5:302022-07-20T17:09:35+5:30
डाॅ. हिरेखन यांना प्रशासनिक कामाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. ते जून २०२१ पासून नागपूर विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत हाेते.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डाॅ. हिरेखन यांना प्रशासनिक कामाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. ते जून २०२१ पासून नागपूर विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत हाेते. याशिवाय जून ते ऑगस्ट २०१५ ला परीक्षा नियंत्रक म्हणून कारभार सांभाळला. त्यांनी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी म्हणूनही सेवा दिली आहे. परीक्षा आणि शिक्षण मंडळाच्या संचालक पदावर एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या काळात कार्यरत हाेते. जानेवारी २०२१ ते जून २०२१ या काळात प्रभारी कुलसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
२०१५ साली नागपूर विद्यापीठाचे सर्वाेत्तम अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. साडेतीन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून १९९९ ते २००३ या काळात रामटेकच्या कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी ॲण्ड सायन्स येथे विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे.