डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

By admin | Published: April 15, 2017 01:45 AM2017-04-15T01:45:08+5:302017-04-15T01:45:08+5:30

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने

Dr. The birth anniversary of Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Next

जिल्हाभर भीमरॅली व प्रबोधन कार्यक्रम : शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, सामाजिक संघटनांच्यावतीने महामानवाला अभिवादन
गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्ताने शुक्रवारी जिल्हाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. जयंतीच्या निमित्ताने गावागावांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमही पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर, कोषागार अधिकारी उमेश गायकवाड, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावने, समाजकल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उमेश पोरेड्डीवार, दिवाकर पोरेड्डीवार, मनीषा खेवले, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पुरनवार, शहर अध्यक्ष शेखर मडावी, राजू डांगेवार, रामचंद्र वाढई, योगेश निमगडे, राजू गुडलवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर परिषद गडचिरोली - स्थानिक नगर परिषदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा योगिता पिपरे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी कृष्णा निपाणे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, सुधाकर येनगंधलवार, प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, नगर परिषदेचे बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, नगरसेवक भूपेश कुळमेथे, नितीन उंदीरवाडे, निंबोड यांच्यासह इतर नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
नगर पंचायत एटापल्ली - नगर पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुक्तिपथ अभियान एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नगर पंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, उपाध्यक्ष रमेश गंपावार, पाणीपुरवठा सभापती जितेंद्र टिकले, बांधकाम सभापती हिचामी, रोहणकर, दीपक सोनटक्के, भसारकर, ज्ञानेश्वर रामटेके, नानाजी दुर्वा, नामदेव दुर्गे, महिला व बालकल्याण सभापती सगुणा हिचामी, सुनीता चांदेकर, अंगुलीमाल उराडे, पुरूषोत्तम वाळके, महेश करमरकर, शंकर करमरकर, विठ्ठल कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.
नगर पंचायत धानोरा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ललीत बरछा, मुख्याधिकारी नैताम, सहायक बीडीओ वानखेडे, विस्तार अधिकारी जुवारे, आरोग्य सभापती येरमे, नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल, चातगाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य टी. के. बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून एन. डी. नवघडे, डब्ल्यू. एस. तडसे उपस्थित होते. प्राचार्य बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान घोषवाक्य व भाषण स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन बी. आर. मुळे तर आभार एच. बी. चौधरी यांनी मानले.
भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के. बी. बांगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. यू. व्ही. मुंगमोडे, डी. के. समर्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंगमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विलास पिंपळकर तर आभार संजय बन्सोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी गजानन सडमेक, तिरूपती बैरवार यांनी सहकार्य केले.
पंचशील बौद्ध समाज, अडपल्ली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अडपल्ली येथे साजरी करण्यात आली. पुंडलिक खोब्रागडे यांच्या हस्ते निळा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोहर खोब्रागडे, भाष्कर वाकडे, गुलाब सेमस्कर, मुखरू रायपुरे, राजू मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिथून रायपुरे, निशांत खोब्रागडे, कुणाल रायपुरे, सचिन मेश्राम, नरेंद्र रायपुरे, जयंत वाकडे, सौरभ खोब्रागडे, अनिकेत खोब्रागडे, अखिल वाकडे, दिवाकर खोब्रागडे, रामदास खोब्रागडे, केशरी रायपुरे, माया रायपुरे, रेखा खोब्रागडे, नंदा खोब्रागडे, भिवरू वाकडे, नीलिमा मेश्राम, दीपा खोब्रागडे, पल्लवी खोब्रागडे, संगीता सेमस्कर यांनी सहकार्य केले.
संजीवनी विद्यालय, नवेगाव, गडचिरोली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सुनील पोरेड्डीवार, व्ही. ए. ठाकरे उपस्थित होते. दरम्यान मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन एडलावार तर आभार किरमिरवार यांनी मानले.
संत गाडगेमहाराज विद्यालय, गडचिरोली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विश्वास भोवते, प्रमुख अतिथी म्हणून आर. डी. उंदीरवाडे, बी. आर. मेश्राम, बी. बी. कान्हेकर, आर. एन. कऱ्हाडे, व्ही. बी. धकाते उपस्थित होते. डॉ.

Web Title: Dr. The birth anniversary of Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.