डॉ. प्रमोद साळवे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:16+5:302021-07-05T04:23:16+5:30

या कार्यक्रमाला महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जिल्हा परिषद ...

Dr. Pramod Salve felicitated | डॉ. प्रमोद साळवे यांचा सत्कार

डॉ. प्रमोद साळवे यांचा सत्कार

Next

या कार्यक्रमाला महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, पोलीस मदत केंद्र चातगावचे मोहिते, चातगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच नारायण सयाम, प्रतापशहा मडावी, पांडुरंग कुमरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल मेश्राम, भक्तदास बुरेवार, आकाश धुडसे, दिवाकर घुडसे, पुरुषोत्तम बुरेवार, सुखदेव देबलकार, भोजराज भोयर, मनोहर इष्टाम, भास्कर पंदरे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना शैलेंद्रकुमार म्हणाले, डॉ. प्रमोद साळवे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या माध्यमातून येथील आदिवासी, मागासवर्गीय गरीब मुलीना शिक्षित करून विकासाच्या प्रवाहात आणले. यामुळे त्यांना नाेकऱ्या प्राप्त होऊन त्यांचे जीवनमान उंचावले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील डाॅ. साळवे यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही, असे गाैरवाेद्गार शैलेंद्रकुमार यांनी काढले.

Web Title: Dr. Pramod Salve felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.