डॉ. प्रमोद साळवे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:16+5:302021-07-07T04:45:16+5:30
या कार्यक्रमाला महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जिल्हा परिषदचे ...
या कार्यक्रमाला महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, चातगाव पोलीस मदत केंद्राचे मोहिते, चातगावचे माजी सरपंच नारायण सयाम, प्रतापशहा मडावी, पांडुरंग कुमरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल मेश्राम, भक्तदास बुरेवार, आकाश धुडसे, दिवाकर घुडसे, पुरुषोत्तम बुरेवार, सुखदेव देबलकार, भोजराज भोयर, मनोहर इष्टाम, भास्कर पंधरे आदी उपस्थित हाेते.
याप्रसंगी शैलेंद्रकुमार म्हणाले, डॉ. प्रमोद साळवे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या माध्यमातून येथील आदिवासी, मागासवर्गीय गरीब मुलीना शिक्षित करून विकासाच्या प्रवाहात आणले. यामुळे त्यांना नाेकऱ्या प्राप्त होऊन त्यांचे जीवनमान उंचावले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील डाॅ. साळवे यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही, असे गाैरवाेद्गार शैलेंद्रकुमार यांनी काढले.