डाॅ. आमटे यांच्याकडून आयुक्तांनी जाणली आदिवासी संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:52+5:302021-01-04T04:29:52+5:30
भामरागड : विभागीय आयुक्त संजीवकुमार हे गडचिराेली जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असताना त्यांनी हेमलकसा येथील लाेकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन डाॅ. प्रकाश ...
भामरागड : विभागीय आयुक्त संजीवकुमार हे गडचिराेली जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असताना त्यांनी हेमलकसा येथील लाेकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन डाॅ. प्रकाश आमटे व डाॅ. मंदाकिनी आमटे यांच्यासाेबत चर्चा करून भामरागड तालुक्यातील आदिवासी संस्कृती त्यांचे जीवनमान व आराेग्य याविषयी जाणून घेतले. यावेळी त्यांच्यासाेबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला हाेते. विभागीय आयुक्तांनी लाेकबिरादरी प्रकल्पातील प्राणी अनाथालय, आश्रमशाळा, वसतिगृह, बांबू हस्तकला व दवाखान्याला भेट देऊन डाॅ. प्रकाश आमटे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. आश्रमशाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. प्रकल्पात आदिवासींच्या आराेग्याविषयी विविध उपक्रम राबविले जातात. याची माहिती डाॅ. प्रकाश आमटे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह लाेकबिरादरी दवाखान्याचे संचालक डाॅ. दिगंत आमटे, डाॅ. अनघा आमटे, उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. कुणाल साेनवणे, तहसीलदार अनमाेल कांबळे, मुख्याधिकारी डाॅ. सूरज जाधव, नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार उपस्थित हाेते.