नाली बांधकामात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:43 AM2018-06-14T00:43:53+5:302018-06-14T00:43:53+5:30

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरातील बसेरा कॉलनीत दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराने केवळ खोदकाम करून काम अर्धवट ठेवले आहे.

Drain construction work delay | नाली बांधकामात दिरंगाई

नाली बांधकामात दिरंगाई

Next
ठळक मुद्देअर्धवट कामाकडे पालिकेचे दुर्लक्ष : बसेरा कॉलनीतील नागरिकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरातील बसेरा कॉलनीत दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराने केवळ खोदकाम करून काम अर्धवट ठेवले आहे. यामुळे नाली बांधकामासाठी खोदण्यात आलेली माती रस्त्यावर आहे. तसेच बांधकाम साहित्यही रस्त्यावर असल्याने या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
दलित वस्ती योजनेतंर्गत बसेरा कॉलनीत नाली बांधकाम मंजूर करण्यात आले. एका बाजूच्या नालीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजुची नाली बांधण्यासाठी संबंधीत कंत्राटदाराने खोदकाम केले. या खोदकामास तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अतिशय संथगतीने बसेरा कॉलनीत हे काम सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळ्याला सुरूवात झाली असल्याने नागरिकांची समस्या आणखी तीव्र झाली आहे. पालिकेचे नगराध्यक्ष व विभाग प्रमुख व कर्मचाºयांना सांगूनही या कामाची गती वाढविण्यात आली नाही. नाली बांधकामासाठी खोदलेली माती रस्त्यावर असल्याने आवागमनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी सिराज हिराणी, राकाँचे पदाधिकारी मुस्तक अब्दुल गणी शेख, उईके, कटारे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
बसेरा कॉलनीत वस्ती वाढली आहे. ज्या ठिकाणी नाली बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्या परिसरात १० ते १५ घरे आहेत. या घरातील लोकांना अर्धवट कामामुळे पावसाळ्यात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बसेरा कॉलनीतील समस्या मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
असाच प्रकार शहराच्या विविध वॉर्डांमध्ये विकास कामांच्या बाबत सुरू आहे. मात्र पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे.
नगरसेवकांनी केली होती तक्रार
सोनापूर कॉम्प्लेक्स प्रभागाचे नगरसेवक संजय मेश्राम व नगरसेविका रंजना गेडाम यांनी सदर काम योग्य रित्या व गतीने होत नसल्याची तक्रार पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे केली होती. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना माहिती देण्यात आली. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून या कामात गती व सुधारणा करण्यात आली नाही, अशी माहिती विद्यमान सभापती संजय मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना दिली. नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन आपण पाठपुरावा केला होता, असे मेश्राम म्हणाले.

Web Title: Drain construction work delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.