नाली बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:59+5:302021-01-08T05:56:59+5:30
सिराेंचा : स्थानिक नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मध्ये नालीचे बांधकाम सुरू आहे. परंतु बांधकामासाठी लागणारी रेती व ...
सिराेंचा : स्थानिक नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मध्ये नालीचे बांधकाम सुरू आहे. परंतु बांधकामासाठी लागणारी रेती व गिट्टी आदी साहित्य चक्क रस्त्यावरच टाकल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित कंत्राटदार मनमानी करून काम करीत आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे. सिराेंचा येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या एका बाजूने नाली बांधकाम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदाराने रस्त्यावर गिट्टी व रेती टाकली आहे. तसेच मिक्सर मशीन लावून मार्गच बंद केला. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांसमाेर रहदारीचा प्रश्न आहे. काेणतेही बांधकाम करताना बांधकाम साहित्यामुळे इतरांना त्रास हाेणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परंतु प्रभाग क्रमांक १५ मध्ये संबंधित कंत्राटदाराने याबाबत दक्षता घेतली नाही. रस्त्यावर साहित्य टाकल्याने येथून नागरिकांना ये-जा करता येत नाही. नागरिकांना रहदारीच्या समस्येचा सामना करावा लागत असतानाही संबंधित यंत्रणेचे अभियंते दुर्लक्ष करीत आहेत. या भागातील नागरिकांना फेऱ्याने आपले घर गाठावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून बांधकाम साहित्य एका बाजूला ठेवून किमान अर्धा रस्ता तरी माेकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स .....
बांधकामही संथगतीने
सिराेंचा येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये सुरू असलेले नाली बांधकाम संथगतीने केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आवागमनासाठी त्रास हाेत आहे. याशिवाय शहरातील विविध भागामध्ये सुरू असलेली कामे कासवगतीने केली जात आहेत. शासकीय बांधकाम केले जात असताना साहित्य याेग्यप्रकारे व याेग्य ठिकाणी न ठेवता रस्त्यावरच ठेवले जात असल्याने रहदारीस अडथळा होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी जागा निश्चित करावी व जलदगतीने कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.