झाडीपट्टीचे नाट्यकलावंत कपडे इस्त्री, मजुरी करून भरत आहेत पोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:00 AM2020-11-09T05:00:00+5:302020-11-09T05:00:18+5:30

अतुल बुराडे लोकमत न्यूज नेटवर्क विसोरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांना कमीअधिक प्रमाणात बसला. यातून ...

The dramatic clothes of the bush are being ironed, the stomachs are being filled by wages | झाडीपट्टीचे नाट्यकलावंत कपडे इस्त्री, मजुरी करून भरत आहेत पोट

झाडीपट्टीचे नाट्यकलावंत कपडे इस्त्री, मजुरी करून भरत आहेत पोट

Next

अतुल बुराडे
लोकमत न्यूज नेटवर्क

विसोरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांना कमीअधिक प्रमाणात बसला. यातून कलाक्षेत्रही सुटू शकले नाही. नाटकांचे प्रयोग बंद असल्याने अनेक कलाकारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे ते मिळेल तो व्यवसाय करून जीवन जगत आहेत. मोहटोला किन्हाळा येथील तबलावादक असलेल्या नीलकंठ बारसागडे यांनी कपडे इस्त्रीचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला आहे.
नाटकात प्रत्यक्ष भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहत असले तरी नाटक यशस्वी करण्यासाठी शेकडो हात काम करीत राहतात. यांना बॅकस्टेज कलाकार संबोधल्या जाते. ऑर्गन, तबला, नाल, ध्वनी व प्रकाश नियंत्रक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, सीनसिनरी, नेपथ्य, प्राम्टर, डेकोरेशन सांभाळणारे कामगार आदींना बॅकस्टेज कलाकार संबोधल्या जाते. नाटकाचे श्रेय रसिक बहुदा रंगमंचावर दिसणाऱ्या कलाकारांना श्रेय देतात. मात्र त्यांच्या व्यतीरिक्त अन्य कलाकार सुद्धा पडद्यामागे भगिरथ प्रयत्न करीत राहतात. नाटके बंद असल्याने या सर्वांचा रोजगार हिरावल्या गेला आहे.

पुढच्या हंगामाची हमी देता येत नाही
मार्च महिन्यापासूनच देसाईगंज येथे कपडे इस्त्रीचे दुकान सुरू केले आहे. या दुकानामुळे जगणे सोपे झाले आहे. नाटकाच्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत थोडीफार कमाई होत होती. आता मात्र नाटके बंद आहेत. ती सुरू होतीलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे पोटासाठी हा व्यवसाय करावा लागत आहे.
- नीलकंठ बारसागडे, तबलावादक, मोहटोला/किन्हाळा

वाद्य विकण्याचा विचार होता, मात्र सावरलोे
मागील आठ वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांमध्ये ऑर्गन वाझवत संगीत देत आहे. ८० ते ९० नाटकांमध्ये दरवर्षी ऑर्गन वाजवितो. अचानक नाटके बंद झाल्याने वाद्य विकण्याचा विचार मनात आला होता. मात्र स्वत:ला सावरलो. आता मार्केटिंगच्या कामावर रोजीने जात आहे.
- भागवत त्रिकारवार,
ऑर्गनवादक, विसोरा


नाटक हा मुख्य रोजगार असणाऱ्यांचे हाल
काही कलाकार नाटकांमध्ये काम करण्याबरोबरच इतर आठ महिने दुसरा रोजगार करतात. त्यांचा संसार लॉकडाऊनमध्येही सावरला आहे. तर काही कलाकार मात्र केवळ नाटकांवरच अवलंबून आहेत. सध्या नाटके बंद असल्याने या कलाकारांचे हाल आहेत.

Web Title: The dramatic clothes of the bush are being ironed, the stomachs are being filled by wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.