ग्रामीण भागात वीज पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 12:40 AM2017-07-11T00:40:58+5:302017-07-11T00:40:58+5:30

पेठा-जिमलगट्टा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांमध्ये विजेसह अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे.

Drive power to rural areas | ग्रामीण भागात वीज पोहोचवा

ग्रामीण भागात वीज पोहोचवा

Next

पालकमंत्र्यांना निवेदन : ऋषी पोरतेट यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : पेठा-जिमलगट्टा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांमध्ये विजेसह अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. या भागाच्या विकासाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालून मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय कोंजेड अंतर्गत येणाऱ्या लोहा, कल्लेड, कोंजेड, ग्रामपंचायत कार्यालय देचलीअंतर्गत येणाऱ्या मुकनपल्ली, आसली, वेडमपल्ली ग्रामपंचायतीमधील जुनी वस्ती, दामरंचा ग्रामपंचायत क्षेत्रातील रूमलकसा, लोंडेर, चिटवेली, चिंतारेव, झारगुडा, मोदुमडगू या गावांमध्ये वीज पुरवठा करावा, दामरंचा, पेठा येथे शेतकऱ्यांसाठी गोदाम बांधून द्यावे, कल्लेड व लोहा येथे तलाव मंजूर करावे, मुत्तापूर येथील गणपत जियाला, कोडसेपल्लीतील व्यंकय्या निलम, जोगनगुडातील मासा मडे, पेठातील मधुकर वेलादी, चंद्रय्या पोरतेट, अर्कापल्ली येथील स्मशानभूमी येथे हातपंप मंजूर करावे, जिमलगट्टा येथे पाणीपुरवठा योजना बांधावी आदी मागण्या पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून ऋषी पोरतेट यांनी केल्या आहेत.

Web Title: Drive power to rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.