परवाना नसतानाही चालवतात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:53+5:302021-09-18T04:39:53+5:30

अतिक्रमणांमुळे अपघात वाढले आरमाेरी : शहरातील विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस ...

Drive vehicles without a license | परवाना नसतानाही चालवतात वाहने

परवाना नसतानाही चालवतात वाहने

Next

अतिक्रमणांमुळे अपघात वाढले

आरमाेरी : शहरातील विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी होत आहे. या साहित्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आरमाेरी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या मार्गावरून जड वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. दिवसेंदिवस अतिक्रमणाची समस्या वाढत चालली आहे.

वैयक्तिक शौचालयांची गावात कमतरता

अहेरी : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, आदी दुर्गम तालुक्यांतील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचास बसतात. बाहेर शाैचास गेल्यास यापूर्वी त्यांच्यावर दंड ठाेठावला जात हाेता. आता मात्र ही माेहीम बंद झाली आहे. त्यामुळे उघड्यावर शाैचास बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ओपन स्पेसचा विकास करण्याची गरज

देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणांच्या ओपन स्पेसला संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. नगर परिषदेने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी आहे. ओपन स्पेसमध्ये बगीचे तयार करून या ठिकाणी कसरतीचे साहित्य ठेवल्यास वृद्धांसाठी साेयीचे हाेईल.

लाईनमनअभावी विजेची समस्या वाढली

धानाेरा : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युतपुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाईनमन द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महावितरणमध्ये लाईनमन हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. मात्र अनेक पदे रिक्त आहेत.

मधसंकलनातून राेजगार निर्मिती शक्य

वैरागड : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मधसंकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

घाण पाण्याच्या गटारीने डास वाढले

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डांत मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके, तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या डबक्यांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कन्नमवार वॉर्डात अशा प्रकारची घाण पाण्याची गटारे अनेक ठिकाणी आहेत.

Web Title: Drive vehicles without a license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.