ऑटो नदीत कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:11 PM2019-01-31T23:11:38+5:302019-01-31T23:12:29+5:30

गडचिरोली शहराजवळच्या कठाणी नदी पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चालक ठार झाला तर इतर सात प्रवासी जखमी झाले आहेत.

The driver killed the driver collapsing in the river | ऑटो नदीत कोसळून चालक ठार

ऑटो नदीत कोसळून चालक ठार

Next
ठळक मुद्देकठाणी नदीत कोसळला : साखऱ्यातील सात प्रवासी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहराजवळच्या कठाणी नदी पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चालक ठार झाला तर इतर सात प्रवासी जखमी झाले आहेत.
डंबाजी कुरूडकर रा. काटली असे मृतक चालकाचे नाव आहे. या अपघातात साखरा येथील इंदिरा टेंभुर्णे (४०), गोविंदा मेश्राम (६५), भास्कर डोईजड (४५), प्रेमिला गायकवाड (४०), निशा उंदीरवाडे (४०), यमुनाबाई डोंगरवार सर्व रा. साखरा अशी जखमींची नावे आहेत. एमएच ३४ डी ५९१६ क्रमांकाचा आॅटो प्रवासी घेऊन आरमोरी मार्गाकडे गडचिरोलीकडे येत होत होता.
दरम्यान नदीच्या पुलावर दुसरा एक ऑटो उभा असल्यामुळे साखऱ्याकडून येणाऱ्या ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो ऑटो नदीपात्रात कोसळला. यामध्ये चालकाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघात
कठाणी नदीवरील जुना पूल ठेंगणा तसेच अरूंद आहे. पावसाळ्यादरम्यान या पुलाच्या बाजूला गाळ साचला. त्यामुळे दोन वाहने समोर आल्यानंतर गाळाच्या मातीमुळे वाहन घसरत होते. वाहन घसरल्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून वाहन नदीपात्रात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. सदर गाळ उचलावा यासाठी लोकमतने अनेकवेळा वृत्त प्रकाशित करून बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते.

Web Title: The driver killed the driver collapsing in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.