आधुनिक खाद्य पदार्थांच्या गर्दीतही वाळवणाची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:41+5:302021-04-12T04:34:41+5:30
पिझ्झा, बर्गर, न्यूडल्स अशा इस्टंट फुडच्या काळातही पारंपरिक वड्या, पापड, कुरोड्या, शेवया, चिप्स तयार करताना महिलांची लगबग दिसून येत ...
पिझ्झा, बर्गर, न्यूडल्स अशा इस्टंट फुडच्या काळातही पारंपरिक वड्या, पापड, कुरोड्या, शेवया, चिप्स तयार करताना महिलांची लगबग दिसून येत आहे.
ग्रामीण भागात शेतातील कामे आटोपल्यावर शेतकरी रब्बी हंगामात उत्पादन झालेले उडीद, मूग, लाखोळी इतर कडधान्य पिके स्वच्छ धुवून त्याची भरडाई करून घरी आणतात. त्यानंतर महिला वड्या, पापड, शेवया आदी पदार्थ तयार करतात. या कामासाठी वृद्ध महिला, शाळकरी मुलीसुद्धा हातभार लावत असतात. त्यामुळे सध्या ग्रामीण भागातील घराघरात वड्या, चिप वाळत टाकलेले दिसून येत आहेत.
बदलत्या काळानुसार खानपान पद्धतीत बदल होऊ लागला आहे. आज सगळे पदार्थ रेडिमेड मिळत असतात त्यामुळे काही जण त्या पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र अशाही अवस्थेत ग्रामीण भागातील महिला वड्या, पापड, शेवया आदी पदार्थ तयार करण्यात मागे नाहीत. मात्र याची लज्जत सुद्धा न्यारी असते. विशेषतः उडीद, वड्या सर्वांच्या आवडीच्या असतात यासाठी महिला वर्षभर अधूनमधून त्याचा भाजीसाठी उपयोग करीत असतात. त्यामुळे रेडिमेड खाद्यपदार्थ मिळणाऱ्या युगातही ग्रामीण भागातील वाळवण पदार्थ टाकण्याची परंपरा कायम आहे.