१५ वर्षांपासून घरकुलाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:36 AM2018-06-25T00:36:41+5:302018-06-25T00:37:55+5:30

सावलखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे मागील १५ वर्षांपासून कुळाच्या घरात वास्तव्याने आहेत. घरकुलासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र प्रशासनातील शुक्राचार्यांमुळे प्रत्येक वर्षी घरकूल हुलकावणी देत आहे.

Due to the age of 15 years | १५ वर्षांपासून घरकुलाची हुलकावणी

१५ वर्षांपासून घरकुलाची हुलकावणी

Next
ठळक मुद्देअर्ज विनंत्या कुचकामी : अशोक उईके यांच्या कुटुंबाला कुळाच्या झोपडीचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : सावलखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे मागील १५ वर्षांपासून कुळाच्या घरात वास्तव्याने आहेत. घरकुलासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र प्रशासनातील शुक्राचार्यांमुळे प्रत्येक वर्षी घरकूल हुलकावणी देत आहे.
कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे भूमिहिन आहेत. मागील १५ वर्षांपासून ते एका पडक्या घरात कुटुंबासह वास्तव्याने आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. दिवसभर केलेल्या मजुरीचे पैसे, कुटुंबाचे दोन वेळचे जेवन व आवश्यक गरजांवर खर्च होते. शिल्लक पाचही पैसे पडत नसल्याने घर बांधण्यास ते असमर्थ आहेत. घरकूल योजनेतून घरकूल देण्यात यावा, यासाठी अशोक उईके यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज, विनंत्या केल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सर्वांसाठी घरे ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत मागील वर्षीपासून घरकुलांसाठी अनुदानही दिले जात आहे. ग्रामपंचायतीने घराची स्थिती बघून प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक आहे. मात्र असे न होता धनदांडग्या व सुस्थितीत घर असलेल्या नागरिकांना प्राधान्य देऊन त्यांची घरे बांधून दिली जात आहेत. हा सारा प्रकार बघून अशोक उईके यांचे मन खिन्न होत चालले आहे. त्याचबरोबर शासन व प्रशासनावरील विश्वासही उडत चालला आहे, अशी प्रतिक्रिया अशोक यांनी लोकमतला दिली.

Web Title: Due to the age of 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.