रक्तदानातून बाबूजींना वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:53 PM2018-07-02T22:53:47+5:302018-07-02T22:54:14+5:30

जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी, माजी उद्योग व आरोग्यमंत्री तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्वर्गिय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.२) जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर घेण्यात आले.

Due to blood donation, Babuji honor | रक्तदानातून बाबूजींना वाहिली आदरांजली

रक्तदानातून बाबूजींना वाहिली आदरांजली

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांचा उत्स्फूर्त सहभाग : सामाजिक जाणीवेतून रक्तदानासाठी पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी, माजी उद्योग व आरोग्यमंत्री तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्वर्गिय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.२) जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला अनेकांनी उत्स्फूर्त योगदान देत सामाजिक जाणीवेचा परिचय दिला. विशेष म्हणजे अनेक महिलांनी रक्तदान करून आम्ही आता अबला नाही, असा जणू संदेशच दिला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांच्या हस्ते बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, लोकमत समाचारचे सुनील चौरसिया, हरिष सिडाम, लोकमत सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, बालविकास मंचच्या संयोजिका किरण पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दिवसभर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची रिघ सुरूच होती. उद्घाटनप्रसंगी नलिनी विनायक बोरकर, जयश्री महादेवराव लोखंडे, रश्मी शेखर आखाडे, स्वाती सतीश पवार, किरण राजेशसिंह पवार, अर्चना भांडारकर आदी सखी मंच सदस्यांनी रक्तदान केले. दुपारपर्यंत रक्तदानासाठी नोंदणी सुरूच होती.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सखी सदस्य सोनिया बैस, अंजली वैरागडवार, पुष्पा देवकुले, श्वेता बैस, गेडेकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी अरविंद अलाम, जनसंपर्क अधिकारी, सतीश तडकलावार, तंत्रज्ञ जुमनाके, निशाली भरणे, सहायक जीवन गेडाम, तसेच रक्तदाते राहुल वाळके, रोशन संगीडवार, राकेश कोहपरे, मोहन मुळे, ज्ञानेश्वर गुरनुले आदींनी सहकार्य केले.

Web Title: Due to blood donation, Babuji honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.