बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 04:48 PM2021-12-10T16:48:13+5:302021-12-10T18:08:00+5:30

काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते.

due to bus strike rural students to walk 16 km for school | बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास

बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास

Next
ठळक मुद्देकाेंढाळा-देसाईगंज मार्ग ग्रामीण भागातील मुलींना हाेतोय त्रास

गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर बेमुदत संप सुरू आहे. शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.

काेंढाळासह परिसरातील अनेक गावचे विद्यार्थी पायदळ ८ किमी देसाईगंज येथे ये-जा करीत आहेत. यात त्यांना एका दिवशी १६ किमीची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे लवकर बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

दिवाळीपासून अनेक शाळा आणि महाविद्यालये पूर्ववत सुरू झाली; परंतु बसफेऱ्या बंद असल्याने अनेक विद्यार्थीशाळा व महाविद्यालयांत अद्यापही गेले नाहीत. दूरवर शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची अडचण हाेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोंढाळावरून ८ किमी अंतरावर असलेल्या तालुकास्थळी अनेक विद्यार्थी पायदळ ये-जा करतात. अनेक जण खासगी वाहनाने प्रवास करतात. यासाठी त्यांना पैसे माेजावे लागतात; परंतु ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, असे विद्यार्थी पायदळ जातात. देसाईगंज तालुक्यातील ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी पायदळ देसाईगंज येथे शिक्षणासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसाेय थांबविण्यासाठी लवकर बसफेऱ्या सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

वन्यप्राण्यांपासून धाेका

काेंढाळा येथील सकाळपाहीचे विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत आहे. त्यानंतर सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. विशेष म्हणजे, तालुक्यात वन्यप्राण्यांपासून धाेका आहे. अशास्थितीत सकाळच्या सुमारास पायदळ चालणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक धाेका विद्यार्थिनींना आहे.

Web Title: due to bus strike rural students to walk 16 km for school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.