झाडाला धडक बसल्याने चारचाकी वाहन उलटले

By admin | Published: May 1, 2017 02:13 AM2017-05-01T02:13:15+5:302017-05-01T02:13:15+5:30

नागपूरवरून आरमोरी मार्गे गडचिरोलीकडे येत असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाचा पापुलर शॉप तुटल्याने चारचाकी वाहनाची झाडाला धडक बसली.

Due to the collision of the four-wheelers, the vehicle was reversed | झाडाला धडक बसल्याने चारचाकी वाहन उलटले

झाडाला धडक बसल्याने चारचाकी वाहन उलटले

Next

चार गंभीर : आरमोरी मार्गावर साखरानजीकची घटना
गडचिरोली : नागपूरवरून आरमोरी मार्गे गडचिरोलीकडे येत असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाचा पापुलर शॉप तुटल्याने चारचाकी वाहनाची झाडाला धडक बसली. त्यानंतर सदर वाहन उलटल्याने वाहनातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावर साखरा पासून एक किमी अंतरावर घडली.
नागपूरवरून गडचिरोलीकडे आरमोरी मार्गे चारचाकी वाहन भरधाव वेगात येत होते. दरम्यान या वाहनाची साखरानजीक येनाच्या झाडाला धडक बसली. त्यानंतर वाहन उलटले. घटनेची माहिती कळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना रूग्णवाहिकेने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारासाठी भरती करण्यात आले. सदर अपघातातील वाहन प्रचंड क्षतिग्रस्त झाले. पोलिसांनी रात्री उशीरा हे वाहन बाजुला केले. रात्री उशीरापर्यंत या अपघातातील जखमींची नावे पोलिसांकडून कळू शकले नाही. अपघातस्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
यापूर्वीही आरमोरी मार्गावर कठाणी नदीजवळ तसेच साखरा गावाच्या परिसरात अनेक अपघात घडले. गडचिरोली जिल्ह्यात वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून रस्त्याची रूंदी कायम आहे. पथदिव्यांअभावी आरमोरी मार्गावर अंधार राहत असल्याने रात्री सुध्दा या मार्गावर अपघात होत आहेत. गडचिरोली पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अपघाताची नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.(प्रतिनिधी)

प्रथम आरमोरीची रूग्णवाहिका पोहोचली
सदर अपघातातील जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्यासाठी आरमोरी व गडचिरोली रूग्णालयाला संपर्क साधण्यात आला. सर्वप्रथम आरमोरीची रूग्णवाहिका पोहोचली. त्यानंतर गडचिरोलीची रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

 

Web Title: Due to the collision of the four-wheelers, the vehicle was reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.