धान पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:22 AM2018-03-05T00:22:40+5:302018-03-05T00:22:40+5:30

आरमोरी तालुक्यातील कासवी, अरसोडा व आरमोरी नजीकच्या शेतात काही प्रमाणात सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे यंदाच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे.

Due to crop disease on rice crops | धान पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

धान पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देउन्हाळी पीक : पातळी घटल्याने इटियाडोह धरणाचे पाणी मिळेना

ऑनलाईन लोकमत
वैरागड : आरमोरी तालुक्यातील कासवी, अरसोडा व आरमोरी नजीकच्या शेतात काही प्रमाणात सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे यंदाच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. मात्र वातावरणाच्या बदलामुळे या धान पिकावर रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत.
या भागातील धानपट्ट्यात इटियाडोह धरणाचे पाणी रबी हंगामास सोडले जात होते. मात्र यंदा इटियाडोह धरणातील पाणी पातळी घटल्याने पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही. रबी हंगामातील धान पिकांसाठी धरणाचे पाणी न सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी स्थानिक स्तरावर पाण्याची व्यवस्था करीत आहे. मागील तीन-चार वर्षात वैरागड भागात छोट्या, मोठ्या सिंचन सुविधा निर्माण झाल्याने रबी हंगामातील पीक लागवडीचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Due to crop disease on rice crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.