संपामुळे शासकीय कार्यालये ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:50 PM2019-09-09T23:50:38+5:302019-09-09T23:51:06+5:30
सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्या, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते तत्काळ लागू करावे, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, लिपीक व लेखा लिपीकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत. केंद्राप्रमाणे महिला कर्मचाºयांना प्रसुती, बाल संगोपण रजा व अन्य सवलती लागू कराव्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जुनी पेन्शन लागू करावी या मुख्य मागणीसाठी जिल्हाभरातील सर्वच विभागांचे कर्मचारी ९ सप्टेंबर रोजी लाक्षणिक संपावर गेले. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयासह इतर कार्यालये ओस पडली होती. जिल्हा परिषद, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांना सुध्दा सुटी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात जवळपास सात ते आठ हजार कर्मचारी सहभागी झाले होते.
सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्या, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते तत्काळ लागू करावे, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, लिपीक व लेखा लिपीकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत. केंद्राप्रमाणे महिला कर्मचाºयांना प्रसुती, बाल संगोपण रजा व अन्य सवलती लागू कराव्या. पदोन्नती व सरळ सेवेने करण्यात येणारी नियुक्ती यामधील प्रारंभित वेतनातील तफावत दूर करावी. अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट लागू करावी. सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्या वारसाला पूर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्ती द्यावी, आदी अनेक मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाºयांनी ५ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे.
९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कर्मचाºयांच्या सुमारे ३७ संघटनांनी सहभाग दर्शविला होता. आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चेकºयांच्या गर्दीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय व कॉम्प्लेक्स परिसरातील इतर कार्यालये फुलून गेली होती. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शासकीय कामासाठी जिल्हा परिषद, तहसील कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली होती.
मोर्चाची क्षणचित्रे
आयटीआय चौकात जिल्हाभरातील कर्मचारी सहभागी झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सरकारविरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान झाले. यावेळी काही कर्मचाºयांनी घोषणा लिहिलेला पोशाख घातला होता.
काही शिक्षकांनी भजन सुध्दा म्हटले. भजनातील ढोलकी व टाळीचा आवाज रस्त्याने जाणाºयांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक मोर्चेकऱ्याच्या डोक्यावर एकच मिशन, जुनी पेन्शन असे स्लोगन लिहीलेली पांढऱ्या रंगाची टोपी दिसून येत होती.
पाच हजारांपेक्षा जास्त कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते आयटीआय चौकापर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग दिसून येत होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.
या संघटना झाल्या संपात सहभागी
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारती संघटना, कास्ट्राईब कर्मचारी कल्याणकारी महासंघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, पदविधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, शासकीय आदिवासी आश्रमशाळा अधीक्षक संघटना, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, समाज कल्याण कर्मचारी संघटना, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, फार्मसी ऑफीसर असोसिएशन, नर्सेस संघटना, लेखा कर्मचारी, बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी, वनरक्षक-वनपाल, महसूल कर्मचारी, कृषी सहायक, आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी, हिवताप कर्मचारी, लिपीकवर्गीय संघटना, आयटीआय संघटना, विद्यापीठाचे कर्मचारी, प्रयोगशाळा कर्मचारी, राष्ट्रीय शिक्षक परिषद, विस्तार अधिकारी, सांख्यिकी संघटना आदी जवळपास ३७ संघटनांचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले.