जिल्हा कचेरीसमोर कंत्राटदारांनी दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:47 AM2017-08-03T01:47:15+5:302017-08-03T01:47:52+5:30

केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची भरपाई देण्यात यावी,......

Due to the District Collector's contract, the contractors have to pay | जिल्हा कचेरीसमोर कंत्राटदारांनी दिले धरणे

जिल्हा कचेरीसमोर कंत्राटदारांनी दिले धरणे

googlenewsNext
ठळक मुद्देजुन्या कामावरील जीएसटी रद्द करा : जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य सरकारकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी गडचिरोली जिल्हा कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून मागण्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, देशातील विकासात्मक कामात नेहमी अग्रेसर असणाºया शासकीय कंत्राटदारास जुन्या कामांना जीएसटी कर प्रणाली लावल्यामुळे १८ टक्यांचे नुकसान कंत्राटदारांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे ही जीएसटी कर प्रणाली जुन्या कामांपासून लवकरात लवकर काढण्यात यावी, अन्यथा कंत्राटदार संघटना संपूर्ण राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारेल, असाही इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.
यावेळी संघटनेचे सचिव अजय तुम्मावार म्हणाले की, शासन विविध प्रकारच्या अटी लावून कंत्राटदाराचे हात बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. यात पाच वर्षे जुन्या मशिनरीज वापरता येणार नाही, मात्र आरटीओ १५ वर्षांची परवानगी देत आहे. पाच वर्षात जर नवीन मशिनरीज घ्यावी लागत असेल तर कंत्राटदाराला काम करणे अवघड जाणार आहे. हा निर्णय कंत्राटदारांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. यामुळे अनेक कंत्राटदार रस्त्यावर येतील, अशीही माहिती यावेळी सचिव तुम्मावार यांनी सांगितली.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष आनंद श्रृंगारपवार म्हणाले की, जुन्या कामांवर दोन टक्के व्हॅट भरण्याची प्रणाली होती. त्याप्रमाणे नियोजन करून कामे केली जात होती. मात्र जुन्या कामांवर दोन टक्के व्हॅटऐवजी १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे कंत्राटदारांना १६ टक्क्यांचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हा भुर्दंड कोणत्याही परिस्थिती कंत्राटदार सहन करणार नाहीत. त्याकरिता कामबंद करून उपोषण करण्याचा इशाराही यावेळी श्रृंगारपवार यांनी दिला आहे.
धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिलीप उत्तरवार, सचिव अजय तुम्मावार, कार्याध्यक्ष आनंद श्रृंगारपवार, मार्गदर्शक डी.सी. गुरूभक्षानी, भूषण समर्थ, अरूण निंबाळकर, गुप्ता, नगराळे, आर. के. संचेती, टी. एन. पाटील, बोमनवार, डी.व्ही. पटेल, प्रमोद चिलवे, मकसूदभाई शेख, महेंद्र ब्राह्मणवाडे तसेच कंत्राटदार संघटनेचे सदस्य प्रविण तामशेट्टीवार, नितीन वायलालवार, नितीन मुलकलवार, रोहित विष्णोई, राहूल निलमवार, ब्रिजोश बेदी, छगन धारापुरे, सिताराम टेंभुर्णे, बंडू शनिवारे, स्वप्नील कायरकर, सुनील डोगरा, नीलकंठ गावंडे, बरकद पठाण, अभिजित कोरडे, राधाकिसन येगलोपवार, अमोल आर्इंचवार, संजय पंदिलवार, बन्सी मेहता, रणछोड कलंत्री, सुनील गभणे आदी कंत्राटदार उपस्थित होते.
 

Web Title: Due to the District Collector's contract, the contractors have to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.