पुलाअभावी ४४ किलोमीटरचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:38+5:302021-09-02T05:18:38+5:30

घाेट-रेगडी-एटापल्ली हे अंतर ६८ किमी आहे. परंतु याच मार्गावरील दिना नदीवर पूल नसल्याने नागरिकांना आष्टी-आल्लापल्लीमार्गे एटापल्लीला ११२ कि.मी.चे अंतर ...

Due to lack of bridges, 44 km round trip | पुलाअभावी ४४ किलोमीटरचा फेरा

पुलाअभावी ४४ किलोमीटरचा फेरा

Next

घाेट-रेगडी-एटापल्ली हे अंतर ६८ किमी आहे. परंतु याच मार्गावरील दिना नदीवर पूल नसल्याने नागरिकांना आष्टी-आल्लापल्लीमार्गे एटापल्लीला ११२ कि.मी.चे अंतर प्रवास करून जावे लागते. पुलाअभावी जवळपास दुप्पट अंतर वाढले आहे. जिल्ह्याचा काही भाग अद्यापही रस्ते विकासात मागे आहे. त्यात चामोर्शी ते घोटमार्गे एटापल्ली या ६८ कि.मी. मार्गावर घोट, निकतवाडा, नवेगाव, पोतेपल्ली, माडे आमगाव, पुसगुड्डा, रेगडी, देवदा, बोलेपल्ली, चंदनवेली, गेदा, जीवनगट्टा, एटापल्ली अशी जवळपास १२ गावे येतात. एटापल्लीकडून गडचिरोलीकडे जाणारे वाहनधारक जवळचा मार्ग म्हणून घोट-पोटेगाव मार्गांने जातात. या मार्गावरील देवदाजवळील दिना नदीवर पूल तयार केल्यास या मार्गाचे अंतर अतिशय कमी होईल.

अनेकवेळा या नदीवर पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. देवदा परिसरातील नागरिकांना एटापल्ली येथे तर नदीपलीकडच्या गावातील नागरिकांना चामाेर्शी येथे येण्यासाठी ४४ कि.मी. चे अधिक अंतर पार करून प्रवास करावा लागताे. यात त्यांना मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी देवदालगतच्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

(बाॅक्स)

जीव मुठीत घेऊन प्रवास

आल्लापल्ली-आष्टी मार्गाचे अंतर अधिक असल्याने वाहनधारक या जवळच्या मार्गाचा वापर करतात; मात्र पावसाळ्यात या नदीवरील घोटजवळचा घाट अवघड आहे. घाट दुरुस्त नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने हळूहळू चालवावी लागतात. इतर ऋतूत हा मार्ग वाहनधारकांना परवडण्यासारखा असल्याने वाहनधारक याच मार्गाचा वापर करतात. नाल्यातून पाणी वाहत असल्यास वाहतूक बंद असते. पाणी नसल्यास दुचाकी, चारचाकी व मालवाहू वाहने याच मार्गाचा वापर करतात.

Web Title: Due to lack of bridges, 44 km round trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.