नसबंदीअभावी माेकाट कुत्र्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:32+5:302021-01-22T04:33:32+5:30

गडचिराेली : माेकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले असले तरी गडचिराेली नगर परिषद ...

Due to lack of neutering, the number of macat dogs increased | नसबंदीअभावी माेकाट कुत्र्यांची संख्या वाढली

नसबंदीअभावी माेकाट कुत्र्यांची संख्या वाढली

Next

गडचिराेली : माेकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले असले तरी गडचिराेली नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे माेकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांच्या कळपामुळे गडचिराेलीवासीय त्रस्त आहेत. गडचिराेली शहरात माेकाट जनावरे, कुत्रे व डुकरांची समस्या अतिशय गंभीर आहे. गडचिराेली नगर परिषदेमार्फत अधूनमधून डुकरे पकडण्याची माेहीम राबविली जाते. तरीही डुकरांची संख्या वाढतच चालली आहे. डुकरांच्या समस्येने ग्रस्त नसलेला एकही वाॅर्ड नाही. डुकरांबराेबरच कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. रात्री भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकांची झाेपमाेड हाेत आहे. कुत्र्यांची संख्या वाढत असल्यास त्यांची नसबंदी करण्याचे अधिकार नगर परिषदेला दिले आहेत. मात्र गडचिराेली नगर परिषदेच्या इतिहासात एकदाही नसबंदीची प्रक्रिया राबविली नाही. परिणामी माेकाट कुत्रे वाढत चालले आहेत.

कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या दिवस जीवितहानी हाेण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. मात्र नागरिक याबाबत नगर परिषदेकडे तक्रार करीत नसल्याने शहरात माेकाट कुत्र्यांची समस्या नाही, असा समज नगर परिषदेचा आहे.

बाॅक्स ...

नागरिकांच्या तक्रारी नाहीत?

माेकाट कुत्र्यांबाबत शहरातील नागरिकांच्या नगर परिषद प्रशासनाला तक्रारी प्राप्त हाेत नाहीत. त्यामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याबाबतचा विचार अजूनपर्यंत नगर परिषदेने केला नाही. याचा अर्थ नगर परिषद नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

बाॅक्स ......

त्वचाराेगाच्या संसर्गाची भीती

शहरातील अनेक माेकाट कुत्र्यांना त्वचाराेग झाला असल्याचे आढळून येते. त्वचाराेग संसर्गजन्य असल्याने ताे मानव किंवा इतर पाळीव प्राण्यांना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कुत्र्यांची एवढी वाईट अवस्था आहे की, त्यांच्याकडे पाहतानासुद्धा किळस येते.

Web Title: Due to lack of neutering, the number of macat dogs increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.