पावसाअभावी धान राेवणे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:21+5:302021-07-05T04:23:21+5:30

गडचिराेली जिल्ह्यात सुमारे दाेन लाख हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. येथील अर्थव्यवस्था धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. जवळपास ...

Due to lack of rain, paddy cultivation was delayed | पावसाअभावी धान राेवणे रखडले

पावसाअभावी धान राेवणे रखडले

Next

गडचिराेली जिल्ह्यात सुमारे दाेन लाख हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. येथील अर्थव्यवस्था धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची राेवणी केली जाते, तर ५० हजार हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड केली जाते. राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवले आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत.

बाॅक्स

सिंचन असलेल्यांचे कमी खर्चात राेवणे

जिल्ह्यातील अत्यंत कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. विशेषकरून ज्या शेतकऱ्यांचे शेत वैनगंगा नदीला लागून आहे. अशाच शेतकऱ्यांकडे माेटरपंपची सुविधा आहे. अशाच शेतकऱ्यांचे धानाचे राेवणे सुरू आहेत. प्रत्येक गावात एक ते दाेनच शेतकऱ्यांकडे माेटरपंप आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे राेवणे सुरू नसल्याने अत्यंत कमी दरात मजूर उपलब्ध हाेत आहे. दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर एकाचवेळी शेतकरी राेवणे सुरू करतात. त्यावेळी मजूर मिळत नाही. अधिकची मजुरी देऊन मजुरांना शेतीवर न्यावे लागते.

बाॅक्स

कापसाचा पेरा वाढला

जिल्ह्यात दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. साेयाबीनची जागा आता कापूस घेत आहे. ज्या जागेवर साेयाबीन लावले जात हाेते. त्या ठिकाणी आता कापसाची लागवड केली जात आहे. धानानंतर कापसाचा पेरा जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

काेट

धानाची राेवणी उशिरा झाल्यास उत्पादनात घट हाेते. असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी माझ्या शेतात सर्वाधिक आवत्याच टाकला आहे. कृषी विभाग धान लागवडीच्या नवनवीन पद्धती आणत आहे. त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. पुढच्या वर्षी मी धानाची पेरणी करणार आहे.

-नागेश दाेडके, शेतकरी

काेट

नायलाज म्हणून धानाची शेती करावी लागत आहे. दरवर्षीच पावसाचे विघ्न येतात. यावर्षी आता धानाचे पऱ्हे राेवण्याजाेेगे झाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने राेवणीची कामे खाेळंबली आहेत. दमदार पाऊस पडल्यानंतर शेतकरी एकाचवेळी राेवणे सुरू करतात, अशावेळी मजुरी मिळत नाही.

- रमेश उसेंडी, शेतकरी

बाॅक्स....

काेणत्या तालुक्यात किती पाऊस (मि.मी.)

तालुका अपेक्षित पडलेला टक्के

गडचिराेली ३१६.२ ३३२.४ ७३.५

कुरखेडा ३०५.१ ३१७.७ १०४.१

आरमाेरी २५३.७ २६७.९ १०५.६

चामाेर्शी २०३.३ २६०.१ १२८.०

सिराेंचा २२०.८ ३२९.७ १४९.३

अहेरी २७३.२ २५७.३ १००.८

एटापल्ली ३०६.६ २४८.५ ८१.१

धानाेरा ३३०.६ २१०.३ ६३.६

काेरची ३२२.८ ३५५.८ ११०.२

देसाईगंज २७८.५ ३५५.३ १२७.६

मुलचेरा २६७.५ २१८.८ ८१.८

भामरागड २७०.९ २०२.७ ७४.८

सरासरी २६६.१ २७२.९ १०२.८

बाॅक्स...

आतापर्यंतचा अपेक्षित पाऊस - २६६.१

प्रत्यक्ष झालेला पाऊस - २७२.०९

धानाची राेवणी - २ टक्के

Web Title: Due to lack of rain, paddy cultivation was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.