वनविभागाच्या दुर्लक्षामुळेच चुरचुरानजीकच्या वनाचा ‘चुर्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:15+5:302021-09-24T04:43:15+5:30
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी गायत्री फुलझेले यांनी चुरचुरा गावाजवळ जागा विकत घेतली. लगतच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून २८ एकर वन ...
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी गायत्री फुलझेले यांनी चुरचुरा गावाजवळ जागा विकत घेतली. लगतच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून २८ एकर वन आणि महसूलची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस आले, अन्यथा ही शासकीय जागा हडप झाली असती. वनविभागाचे हे अपयश असून दोषींवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी वासेकर यांनी केली आहे.
बाॅक्स
वाघ पकडण्यातही अपयश
वनजमिनीवर अतिक्रमण होत असल्यानेच अलीकडे वाघांची वस्तीस्थाने व वावरण्याचा परिसर नष्ट हाेत आहे. परिणामी वाघांचे मानवावरील हल्ले वाढले आहेत. जंगल नष्ट हाेत असल्याने हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येत आहेत. हे धोकादायक असून वाघांच्या हल्ल्यात आतापर्यंत १४ लाेकांचा, तर बिबट्यांच्या हल्ल्यात ३ लाेकांचा जीव गेला आहे. वारंवार मागणी करूनही वाघांचा बंदाेबस्त करण्यात वन विभागाला अपयश आल्याचेही वासेकर यांनी म्हटले आहे.