जात वैद्यता प्रमाणपत्र सादरच न केल्याने शिवसेना नगरसेवक अपात्र

By admin | Published: March 18, 2017 02:09 AM2017-03-18T02:09:20+5:302017-03-18T02:09:20+5:30

कोरची नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामाप्रसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर

Due to non-submission of caste validity certificate, Shivsena corporator ineligible | जात वैद्यता प्रमाणपत्र सादरच न केल्याने शिवसेना नगरसेवक अपात्र

जात वैद्यता प्रमाणपत्र सादरच न केल्याने शिवसेना नगरसेवक अपात्र

Next

दीड वर्ष उलटले : कोरची नगर पंचायत
कोरची : कोरची नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामाप्रसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक अरूण नायक यांनी दीड वषार्पासून जात वैद्यता प्रमाण पत्र सादरच न केल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी गुरूवारी त्यांना अपात्र घोषित केले. या बाबतचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती कोरची नगर पंचायत मुख्याधिकारी आशीष चव्हाण यांनी दिली.
नगर पंचायत कोरची येथील २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक अरूण विष्णु नायक यांनी प्रभाग क्रमांक सहा नामाप्र या प्रवगार्तून शिवसेना पक्षाच्या निवडणुक चिन्हावर निवडणुक लढविली होती. त्या निवडणुक नामनिर्देशन अर्जाला नायक यांनी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपुर यांच्याकडे जात पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पावती जोडीली होती. या पावतीच्या भरावरशावर त्यांना निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली. दरम्यान आक्टोबर २०१५ च्या नगर पंचायत निवडणुकीत अरूण नायक प्रभाग सहा मधून निवडून आले आले. निवडून आल्यापासून सहा महिनाच्या आत जात वैद्यता प्रमाण पत्र सादर करणे अनिवार्य असताना देखील जात वैद्यता प्रमाणपत्र सादरच केलेले नसल्याने मुख्याधिकारी नगर पंचायत कोरची यांनी त्यांना १० जून २०१६ ला जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस बजावली होती. तरीही नगरसेवक अरूण नायक यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर केलेला नव्हते.
त्यानंतर मुख्याधिकारी नगर पंचायत कोरची यांनी सदर नोटीसीचा संदर्भ देऊन २५ जानेवारी २०१७ ला १३ जून २०१६ ला त्यांना नोटीस बजाविली होती. त्यानंतर त्यांच्या विरूध्द अपात्र कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. नगरसेवक अरूण नायक यांना जिल्हाधिकारी कार्यालय गड़चिरोली यांनी १५ फेब्रुवारी २०१७ ला पत्र देऊन तीन दिवसाच्या आत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करावे, असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे १६ मार्च २०१७ ला त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला व या संदर्भातील आदेश गुरूवारी कोरची नगर पंचायतीला धडकला. शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता कोरची नगर पालिकेतील पक्षीय बलाबल समसमान झाले आहे. शिवसेनेचे पाच, भाजपचे तीन, काँग्रेस, राकाँ व विकास आघाडीचे आठ संख्याबळ झाले आहे.सदस्यत्व रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Due to non-submission of caste validity certificate, Shivsena corporator ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.