जुन्याच वेतन श्रेणीमुळे डिम्ड ट्रेन्ड शिक्षकांवर अन्याय
By admin | Published: February 13, 2016 12:59 AM2016-02-13T00:59:03+5:302016-02-13T00:59:03+5:30
नॉन मॅट्रिक (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना १ जानेवारीला १९८६ च्या चौथ्या वेतन आयोगानुसार ९७५-१६६० व १९९६ च्या पाचव्या वेतन आयोगानुसार ....
मागणी : पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी द्या
सिरोंचा : नॉन मॅट्रिक (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना १ जानेवारीला १९८६ च्या चौथ्या वेतन आयोगानुसार ९७५-१६६० व १९९६ च्या पाचव्या वेतन आयोगानुसार ३२००-८५-४९०० ही वेतनश्रेणी लागू करून थकबाकीचा लाभ देण्यात आला. परंतु मॅट्रिक असलेल्या (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना चौथ्या वेतन आयोगाप्रमाणे व पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे ४५००-१२५-७००० ही वेतनश्रेणी लागू न करता वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.
राज्यात १९७२ पूर्वी जिल्हा परिषद, नगर पालिका, शिक्षण मंडळ, महानगरपालिका, मान्यता प्राप्त खासगी प्राथमिक शाळा यामध्ये नियुक्त केलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना डिम्ड ट्रेन्ड शिक्षक समजले जाते. डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांमध्ये नॉन मॅट्रिक व मॅट्रिक असलेल्या (अप्रशिक्षित) प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. परंतु नॉन मॅट्रिक असलेल्या डिम्ड ट्रेन्ड शिक्षकांना चौथ्या व पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ देण्यात आला. परंतु मॅट्रिक असलेल्या डिम्ड ट्रेन्ड अप्रशिक्षित शिक्षकांना याचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे या शिक्षकांमध्ये शासनाविरोधी तीव्र रोष व्यक्त होत आहे. मॅट्रिक (अप्रशिक्षित) डिम्ड ट्रेन्ड प्राथमिक शिक्षकांना चौथ्या व पाचव्या वेतन आयोगानुसार लागू केलेली वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सहसचिव अंकम डोन्नय्या यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)