गडचिराेली जिल्ह्यात अवकाळीचा कहर; धान व कापूस शेतीचे माेठे नुकसान
By दिगांबर जवादे | Published: November 28, 2023 07:05 PM2023-11-28T19:05:03+5:302023-11-28T19:05:32+5:30
मंगळवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने धान व कापूस शेतीचे माेठे नुकसान झाले आहे.
गडचिराेली : मंगळवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने धान व कापूस शेतीचे माेठे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेले धान खराब हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे.
साेमवारी चामाेर्शीसह जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते.
दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भामगराड तालुक्याला पावसाने झाेडपून काढले. दुपारी ३ वाजल्यानंतर काेरची, कुरखेडा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जास्त कालावधीच्या धानाची कापणी जाेरात सुरू आहे. काहींच्या धानाची कापणी आटाेपून धानाच्या कडपा शेतात आहेत.
पावसाच्या पाण्यामुळे धानाच्या कडपा ओल्या हाेत आहेत. हातात आलेले धान सडून जाण्याचा धाेका निर्माण झाला आहे. कापूस वेचणीला आला आहे. अवकाळी पावसामुळे कापूस काळे पडण्याचा धाेका निर्माण झाला आहे.