तुडतुड्यामुळे धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:37 AM2017-10-25T00:37:38+5:302017-10-25T00:38:25+5:30

मोहटोला, किन्हाळा परिसरातील धानावर खोडकिडा व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऐन धान निसवत असताना तुडतुडा रोगांमुळे धानपीक करपायला लागले आहे.

Due to turf-paddy threat | तुडतुड्यामुळे धानपीक धोक्यात

तुडतुड्यामुळे धानपीक धोक्यात

Next
ठळक मुद्देकरपण्यास सुरुवात : उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : मोहटोला, किन्हाळा परिसरातील धानावर खोडकिडा व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऐन धान निसवत असताना तुडतुडा रोगांमुळे धानपीक करपायला लागले आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आॅक्टोबर महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अधुनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे थंडी न पडता वातावरणात दमटपणा कायम आहे. दमटपणामुळे मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. किन्हाळा, मोहटोला परिसरातील शिवराजपूर, डोंगरगाव, रिठ, चिखली, पोटगाव, शंकरपूर, कोरेगाव, बोडधा परिसरात तुडतुडा रोगाची मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेकवेळा फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तुडतुडा रोगाची लागण झालेले पीक करपत असल्याने उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. तुडतुडा, मावा व खोडकिडा रोगामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Due to turf-paddy threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.