कुरखेडात विदर्भवाद्यांनी दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:34 AM2018-10-04T01:34:02+5:302018-10-04T01:34:41+5:30
स्थानिक गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गांधी जयंतीदिनी मंगळवारला स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामूहिक उपोषण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : स्थानिक गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गांधी जयंतीदिनी मंगळवारला स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामूहिक उपोषण करण्यात आले. दरम्यान भाजपच्या सत्ताधारी पुढाऱ्यांनी वैदर्भीय जनतेची फसवणूक केली, असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
मागील सार्वत्रीक निवडणुकीत भाजपाने स्वतंत्र विदर्भाचा नारा देत एकहाती निवडणूक जिंकली मात्र त्यानंतर सत्ताधारी पुढाऱ्यांना आश्वासनाचा विसर पडला, अशी टीका यावेळी अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन करताना केली.
स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय हे आंदोलक स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प सुद्धा यावेळी करण्यात आला. या आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुकाध्यक्ष गणपत सोनकुसरे, संघटक वामदेव सोनकुसरे, तालुका उपाध्यक्ष रमेश मानकर, युवक आघाडी अध्यक्ष रामचंद्र रोकडे, ग्यानचंद्र सहारे, महीला आघाडी अध्यक्ष मीना भोयर, उपाध्यक्ष शीला इस्कापे, चितांमन सहारे, तुलाराम कवडो, यादव सहारे, प्रल्हाद खुणे, रामचंद्र कोडाप, राजीराम पात्रीकर, चागंदेव वट्टी, कारु पाटनकर, प्रदीप विढोले, किसनलाल साहळा, गुरूदेव काटेंगे, संतोष साहळा, रामदास शेंडे, रवींद्र जनबंधू, क्रिष्णा जांभुळकर, केवळराम मरसकोल्हे, गिरीधर वट्टी आदी सहभागी झाले होते.