रवी येथे वन्य पशुंसाठी खोदतळ्याची निर्मिती
By admin | Published: February 13, 2016 12:56 AM2016-02-13T00:56:26+5:302016-02-13T00:56:26+5:30
वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या रवी येथे कक्ष क्र. ५५ व ५७ मध्ये खोदतळा खोदण्यात येत असून यामुळे वन्य पशुंना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आरमोरी : वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या रवी येथे कक्ष क्र. ५५ व ५७ मध्ये खोदतळा खोदण्यात येत असून यामुळे वन्य पशुंना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खोदतळ्याचे काम सुरू आहे. या कामावर रवी येथील २५० मजूर कामावर आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांच्या प्रयत्नातून कामाला मंजुरी मिळाली. क्षेत्रसहायक के. बी. उसेंडी यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वनरक्षक नितीन गडपायले, आरमोरीचे वनरक्षक सतीश गजबे, रवीच्या उपसरपंच निर्मला तामसटवार उपस्थित होते. ३० मीटर बाय ३० मीटरचा खड्डा खोदण्यात येणार आहे. रवी परिसरातील वन्यजीवांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी खोदतळा खोदण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार वन विभागाने खोदतळ्याचे काम हाती घेतले आहे. एका महिन्यात काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. जंगलामध्ये इतरही ठिकाणी अशा प्रकारचे खोदतळे खोदल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्याबरोबरच वन्य पशुंचीही तहाण भागणार आहे.