कोरोनाकाळातही जिल्ह्यात २८ मुली झाल्या सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:38 AM2021-02-24T04:38:07+5:302021-02-24T04:38:07+5:30
विशेष म्हणजे अल्पवयीन मुले पळून जाण्याचे प्रमाण अल्प आहे. वर्ष २०१८ मध्ये अल्पवयीन ४ मुले आणि ३१ मुली गायब ...
विशेष म्हणजे अल्पवयीन मुले पळून जाण्याचे प्रमाण अल्प आहे. वर्ष २०१८ मध्ये अल्पवयीन ४ मुले आणि ३१ मुली गायब झाले होते. त्या सर्वांना शोधून परत आणण्यात पोलिसांना यश आले. २०१९ मध्ये ६ मुले आणि ३८ मुली बेपत्ता झाले. त्यापैकी सर्व मुले आणि ३४ मुलींना पोलिसांनी हुडकून काढले. मात्र ४ जणींचा शोध अजूनही सुरू आहे. २०२० मध्ये ३ मुले आणि २८ मुली गेल्या. त्यापैकी तीनही मुले आणि १९ मुलींना परत आणण्यात यश आले. चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. आजुबाजूच्या वातावरणाचा प्रभाव आणि मोबाईलचा अनियंत्रित वापर यासाठी कारणीभूत ठरत आहे.
कोणत्या वर्षात किती मुली गायब?
२०१८- ३१, २०१९-३८, २०२०-२८
१३ मुलींचा शोध सुरू
जिल्ह्यातील १३ मुलींचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यात २०१९ मधील ४ आणि २०२० मधील ९ मुलींचा समावेश आहे. अनेक वेळा अल्पवयीन असलेल्या मुली लग्न करतात आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच समाजासमोर येतात. पण तरीही त्यांच्या जोडीदारावर अपहरणाचा गुन्हा कायम राहतो.
सर्व मुलांना हुडकून काढले
अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या गेल्याने जातात, तर मुले घरातील लोकांच्या रागावर किंवा बाहेरच्या दुनियेत काहीतरी करून दाखवायचे अशा जोशात दूरवर कुठेतरी जातात. अशा प्रकारे दुसऱ्या राज्यात गेलेल्याही मुलांना पोलिसांनी हुडकून काढत घरी आणले. तीन वर्षात १३ मुले गायब झाली होती. त्या सर्वांना शोधून काढण्यात आले.
अल्पवयीन मुला-मुलींना नैतिक शिक्षण आणि घरातील चांगले वातावरण देण्याची गरज आहे. कुटुंब, समाज याबद्दल सामाजिक भान राहिल असे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे. मुलांच्या हाती स्मार्ट फोन देताना त्याचा वापर ते कसे करत आहेत यावरही पालकांचे नियंत्रण राहात नाही. त्यातून हे प्रकार वाढत आहेत.
- उल्हास भुसारी
प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा
२०२० मध्ये एवढ्या मुली झाल्या सैराट
जानेवारी - २
फेब्रुवारी - ६
मार्च - ४
एप्रिल - १
मे - १
जून - १
जुलै - २
ऑगस्ट - ०
सप्टेंबर - १
ऑक्टोबर - १
नोव्हेंबर - ३
डिसेंबर - ६