श्रावण मासात मार्कंडेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:16 PM2018-08-12T23:16:46+5:302018-08-12T23:17:07+5:30
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण मासानिमित्त महिनाभर पूजाअर्चा, अभिषेक, बिल्वार्चन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच दर सोमवारी मार्र्कंडेश्वराची पालखी काढली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण मासानिमित्त महिनाभर पूजाअर्चा, अभिषेक, बिल्वार्चन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच दर सोमवारी मार्र्कंडेश्वराची पालखी काढली जाणार आहे.
संपूर्ण महिनाभर महापूजा करण्याचा मान मंगेश आनंदवार व त्यांच्या पत्नी शितल मंगेश आनंदवार यांना देण्यात आला आहे. १२ आॅगस्ट रोजी श्रावण मासाच्या प्रारंभानिमित्त प्रफुल्ल गजानन भांडेकर व त्यांच्या पत्नी वैशाली भांडेकर, पंकज पांडुरंग पांडे, त्यांच्या पत्नी शुभांगी पंकज पांडे यांच्या हस्ते पूजाअर्चा, अभिषेक व बिल्वार्चन पूजा करण्यात आली.
यावेळी मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, भारतीय पुरातत्व विभागाचे ए. एस. आय. शिंदे, मिथून चलाख यांच्यासह भाविक उपस्थित होते.
श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने मार्र्कंडेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मार्र्कंडादेवस्थान ट्रस्टच्या वतीने पूजेच्या ठिकाणी मंडप, शुध्द पाण्याची व्यवस्था, महाप्रसाद आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत. श्रावणमासभर दर सोमवारी रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेतून पालखी काढली जाईल. ही पालखी मार्र्कंडादेव येथील मुख्य मार्गाने फिरून मार्र्कंडादेव मंदिरात थांबेल. त्यानंतर पुन्हा परत रामप्रसाद महाराज धर्मशाळेकडे येईल. या ठिकाणी पालकीची सांगता होईल. भजन मंडळांचे या ठिकाणी विशेष आकर्षण राहते.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, त्यांचे पती मधुकर भांडेकर यांच्या हस्ते पूजाअर्चा केली जाणार आहे. महिनाभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने भाविकांची मांदियाळी राहणार आहे.