वर्षभरात डिझेल 20 रुपयांनी, तर तेल 70 रुपयांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 05:00 AM2021-05-19T05:00:00+5:302021-05-19T05:00:28+5:30
काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. पहिलेच हातात पैसे नाहीत. अशातच किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागील वर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लिटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या महामारीत महागाईचा भडका उडणे सुरूच आहे. वर्षभराच्या कालावधीत डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे २० रुपयांची वाढ झाली आहे, तर खाद्यतेलही प्रतिलिटर ७० रुपयांनी वाढले आहे. इतरही किरणा साहित्याचे दर वाढल्याने गरीब व सामान्य नागरिकांचे कंबरडे माेडले आहे.
काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. पहिलेच हातात पैसे नाहीत. अशातच किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागील वर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लिटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे. म्हणजेच खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ७० रुपयांची वाढ झाली आहे.
मागील वर्षी मे महिन्यात पेट्राेलचा दर ७० रुपये प्रतिलिटर हाेता. आता हा दर ९० रुपयांवर पाेहाेचला आहे. डिझेलचे दर वाढल्याने वस्तूंचा वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळेच किराणा वस्तूंच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. वाढत्या महागाईनुसार महिन्याचा बजेट तयार करताना महिला वर्गाची दमछाक उडत आहे.
काय म्हणतात गृहिणी
काेराेनाच्या या महामारीत खाद्यतेलासह किराणा साहित्याचेही दर वाढले आहेत. किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेल दर दिवशी वापरली जाणारी वस्तू आहे. मात्र, याची किंमत वर्षभरात दुप्पट झाली आहे. त्यामुळे महिनाभरात किराणावर हाेणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे.
मनीषा नवघडे, गृहिणी
काेराेनामुळे राेजगार गेला आहे. सध्या घरी बसून कसेतरी दिवस काढणे सुरू आहे. घरात काहीही नसले तरी किराणा आवश्यक आहे. मात्र, किराणाचे दर वाढले आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी त्या खरेदी कराव्याच लागणार आहेत.
दामिनी मेश्राम, गृहिणी
दरवर्षी काेणत्याही वस्तूंच्या किमती वाढणे अपेक्षित आहेच. मात्र, खाद्यतेलाची झालेली वाढ अनपेक्षित आहे. वर्षभरात खाद्यतेल दुपटीने वाढले आहे. आताही किमती वाढत आहेत.
लीना चाैधरी, गृहिणी